लो बजेट Micromax In 2b वर मिळवा 1,000 रुपयांची सूट; आज पासून खरेदीसाठी उपलब्ध
By सिद्धेश जाधव | Published: August 6, 2021 11:42 AM2021-08-06T11:42:36+5:302021-08-06T11:43:05+5:30
Micromax In 2b First Sale: Micromax In 2b स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6GB रॅम, Unisoc T610 प्रोसेसर आणि 5000mAh ची बॅटरी दिली आहे.
Micromax In 2b स्मार्टफोन आज दुपारी 12 वाजल्यापासून भारतात खरेदीसाठी उपलब्ध होईल. गेल्या महिन्याच्या अखेरीस हा स्मार्टफोन सादर करण्यात आला होता. हा एक लो बजेट स्मार्टफोन आहे ज्यात कंपनीने 6GB रॅम, 5000mAh बॅटरी, अँड्रॉइड 11 आणि Unisoc T610 ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला आहे. मायक्रोमॅक्स इन 2बी स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये Flipkart आणि Micromaxinfo.com वरून विकत घेता येईल.
Micromax In 2b ची किंमत
Micromax In 2B स्मार्टफोन दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच केला गेला आहे. या फोनचा 4GB + 64GB व्हेरिएंट 7,999 रुपयांमध्ये आणि 6GB + 64GB व्हेरिएंट 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Micromax In 2b स्मार्टफोन फ्लिपकार्टच्या बिग सेविंग डेज सेल आणि Micromaxinfo.com वरून आज दुपारी 12 वाजल्यापासून विकत घेता येईल. हा फोन ICICI आणि Axis बँकेच्या कार्डद्वारे विकत घेतल्यास 1,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.
Micromax In 2B चे स्पेसिफिकेशन्स
मायक्रोमॅक्स इन 2बी मध्ये तिन्ही बाजूंनी बेजल लेस असलेला वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले मिळतो. हा एक 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे जो 400निट्स ब्राइटनेस देतो. या मायक्रोमॅक्स स्मार्टफोनमध्ये 2 ARM Cortex A75 CPU असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह Unisoc T610 चिपसेट आणि अँड्रॉइड 11 ओएस देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये जी52 जीपीयू मिळतो.
Micromax In 2B च्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सरसह एक 2 मेगापिक्सलची सेकंडरी एआय लेन्स कंपनीने दिली आहे. या मायक्रोमॅक्स फोनमध्ये 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा आहे. Micromax In 2B मध्ये रियर फिंगरप्रिंट सेन्सरसह फेस अनलॉक फिचर देखील मिळते. या मायक्रोमॅक्स स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी आहे.