स्वदेशी आणि स्वस्त Micromax In 2B स्मार्टफोन 30 जुलैला होणार लाँच; इथे बघा लाँच इव्हेंटचे थेट प्रक्षेपण
By सिद्धेश जाधव | Published: July 29, 2021 07:06 PM2021-07-29T19:06:36+5:302021-07-29T19:08:44+5:30
Micromax In 2B India Launch: माइक्रोमॅक्स इन 2बी च्या प्रोडक्ट पेजच्या माध्यमातून फोन लाँचच्या आधीचा या फोनचे फोटोज आणि स्पेसिफिकेशन्सचा देखील खुलासा झाला आहे.
गेल्या काही दिवसांपुसून Micromax च्या नवीन स्मार्टफोनच्या बातम्या येत आहेत. कंपनीने देखील आपला नवीन फोन 30 जुलैला भारतात लाँच करणार असल्याचे सांगितले आहे. कंपनीने अधिकृतपणे सांगितले आहे कि 30 जुलैला भारतात लाँच होणारा स्मार्टफोन Micromax In 2B नावाने बाजारात येईल. या स्मार्टफोनसाठी कंपनीने एक प्रोडक्ट पेज देखील लाईव्ह केले आहे, माइक्रोमॅक्स इन 2बी च्या प्रोडक्ट पेजच्या माध्यमातून फोन लाँचच्या आधीचा या फोनचे फोटोज आणि स्पेसिफिकेशन्सचा देखील खुलासा झाला आहे. (Micromax In 2B India Launch on July 30 with Micromax earbuds)
Micromax In 2B लाँच
माइक्रोमॅक्सने सांगितले आहे कि 30 जुलैला भारतात आपला नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे. हा फोन ऑनलाईन इव्हेंटच्या माध्यमातून बाजारात सादर केला जाईल. हा लाँच इव्हेंट 30 जुलैला दुपारी 12 वाजता सुरु होईल, या इव्हेंटचे थेट प्रक्षेपण माइक्रोमॅक्स इंडियाच्या अधिकृत वेबसाइट आणि कंपनीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दाखवला जाईल. त्याचबरोबर माइक्रोमॅक्स इंडियाच्या यूट्यूब चॅनेलवर देखील Micromax In 2B चा लाँच लाईव्ह बघता येईल.
Micromax In 2B चे स्पेसिफिकेशन्स
माइक्रोमॅक्स इंडिया वेबसाइटनुसार हा स्मार्टफोन वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह लाँच केला जाईल. यात स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस असतील आणि चिन पार्ट थोडा रुंद असेल. हा फोन Blue, Green, Black रंगात सादर केला जाऊ शकतो. फोनच्या मागे ड्युअल रियर कॅमेरा आणि फिंगरप्रिंट सेन्सर दिसत आहे.
Micromax In 2B मध्ये 5,000एमएएच बॅटरी मिळेल जी सिंगल चार्जमध्ये 50 तासांचा टॉकटाईम देईल, असा दावा कंपनीने केला आहे. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये माली जी52 जीपीयू मिळेल. माइक्रोमॅक्स इन 2बी ने 176847 अंतुतु स्कोर मिळवला आहे, अशी माहिती प्रोडक्ट पेजवरून मिळाली आहे.
Micromax IN 2B स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा एचडी+ आयपीएस डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा फोन अँड्रॉइड 11 सह UNISOC T610 SoC प्रोसेसरवर चालेल आणि फोनमध्ये 4GB रॅम + 64GB स्टोरेज मिळू शकते. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स मिळू शकते. तसेच हा फोन 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्यासह सादर होऊ शकतो.