मस्तच! 5G स्मार्टफोनसाठी स्वदेशी कंपनीची जोरदार तयारी; Micromax चीनी कंपन्यांना पडणार भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 05:03 PM2021-02-11T17:03:07+5:302021-02-11T17:09:04+5:30

Micromax 5G Smartphones : मायक्रोमॅक्सने गेल्याच वर्षी भारतीय स्मार्टफोन बाजारात पुनरागमन केलं आहे. 

micromax 5g phone to launch very soon says co founder rahul sharma | मस्तच! 5G स्मार्टफोनसाठी स्वदेशी कंपनीची जोरदार तयारी; Micromax चीनी कंपन्यांना पडणार भारी

मस्तच! 5G स्मार्टफोनसाठी स्वदेशी कंपनीची जोरदार तयारी; Micromax चीनी कंपन्यांना पडणार भारी

googlenewsNext

नवी दिल्ली -  देशात स्वदेशी कंपनीने 5G स्मार्टफोनसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. भारतात Micromax चा 5G फोन लवकरच लाँच करण्यात येणार आहे. कंपनीचे सहसंस्थापक राहुल शर्मा यांनी युजर्ससोबत असलेल्या एका व्हिडीओ सेशनमध्ये याबाबत माहिती दिली आहे. यासोबतच त्यांनी कंपनीचे पहिले ट्रू वायरलेस स्टीरियो (TWS) इअरबड्स देखील लवकरच लाँच केले जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. मायक्रोमॅक्सने गेल्याच वर्षी भारतीयस्मार्टफोन बाजारात पुनरागमन केलं आहे. 

राहुल शर्मा यांनी बंगळुरूच्या R&D सेंटरमध्ये इंजिनिअर 5G फोनसाठी खूप जास्त मेहनत करत असल्याचं म्हटलं आहे. मात्र याच्या लाँचिंगबाबत नेमकी माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. लवकरच तो लाँच केला जाईल असं म्हटलं आहे. गेल्या वर्षा शर्मा यांनी एका मॉडल संदर्भात काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्यामध्ये 6GB रॅम, हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि लिक्विड कूलिंग देण्यात येईल असं म्हटलं होतं. मात्र याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळेच हे स्पेसिफिकेशन्स हे मायक्रोमॅक्सच्या अपकमिंग 5G फोनमध्ये दिले जाऊ शकतात. 

मायक्रोमॅक्सच्या या 5G स्मार्टफोनमुळे चीनी कंपन्यांना टक्कर मिळणार आहे. 5G फोनसोबतच बंगळुरूमधील इंजिनिअर्स हे मोबाईल अ‍ॅक्सेसरीज देखील विकसित करत असून पहिलं प्रोडक्ट हे ऑडिओ रिलेटेड असण्याची शक्यता असल्याची माहिती शर्मा यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. मोठ्या काळानंतर भारतीय स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्सनेभारतीय बाजारात पुनरागमन केले आहे. ऑनलाईन इव्हेंटमध्ये कंपनीने दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. Micromax In Note 1 आणि Micromax In 1B हे दोन बजेट फोन आणले आहेत. 

Micromax चा जोश पाहून चिनी कंपन्या बेहोश; दोन स्वस्त स्मार्टफोन लाँच

कंपनीने दोन्ही फोनला 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने Micromax In Note 1 डिव्हाईस दोन व्हेरिअंटमध्ये घेऊन आली आहे. यामध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज देण्यात आले असून किंमत 10,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर दुसरे व्हेरिअंट 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. याची किंमत 12,499 रुपये ठेवण्य़ात आली आहे. दुसरा स्मार्टफोन Micromax In 1B ला 4 जीबी रॅम 64 जीबी स्टोरेजसह बाजारात आणण्यात आला आहे. या फोनची किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे. दुसरे व्हेरिअंट 2 जीबी रॅम  32 जीबी स्टोरेजचे आहे. याची किंमत 6,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

लय भारी! WhatsApp वर फक्त 'Hi' पाठवा अन् नोकरी मिळवा; लॉकडाऊनमध्ये बेरोजगार झालेल्यांसाठी सुवर्णसंधी

व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असून त्याचा वापर हो मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र आता व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप hii पाठवा आणि नोकरी मिळवा अशी एक योजना आली आहे. लॉकडाऊनमध्ये बेरोजगार झालेल्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी असून सरकारने ही योजना आणली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर हाय पाठवल्यानंतर मजुरांना त्यांच्या कौशल्यानुसार नोकऱ्या मिळणार आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने (Department of Science and Technology ) बुधवारी लाँच केलेल्या केलेल्या कृत्रिम-बुद्धिमत्ता चॅटबॉटमुळे हे सहज शक्य होणार असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाच्या संकटात अनेक मजूरांनी आपलं उत्पन्नाचं साधन गमावलं. या पोर्टलवर भारतातील MSME चा संपूर्ण नकाशा आहे. नोकरीची उपलब्धता आणि त्यांना आवश्यक असलेलं कौशल्य वापरून हे पोर्टल त्यांच्या प्रांतातील संभाव्य रोजगाराच्या संधी असलेल्या मजुरांशी जोडले जाईल.

Web Title: micromax 5g phone to launch very soon says co founder rahul sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.