मायक्रोमॅक्स Bharat 3, Bharat 4 स्मार्टफोन लॉंच, जाणून घ्या काय आहेत फिचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 03:22 PM2017-09-18T15:22:50+5:302017-09-18T15:26:28+5:30

भारतातील नामांकित कंपनी मायक्रोमॅक्सने ग्राहकांना परवडतील असे दोन 4G VoLTE स्मार्टफोन लॉंच केले आहेत. मायक्रोमॅक्स Bharat 3 आणि Bharat 4 अशी या दोन स्मार्टफोनची नावे असून यांची किंमत अनुक्रमे 4,499 व  4,999 रुपये इतकी आहे.

Micromax Bharat 3, Bharat 4 Smartphone Launch, Learn What Are Factors ... | मायक्रोमॅक्स Bharat 3, Bharat 4 स्मार्टफोन लॉंच, जाणून घ्या काय आहेत फिचर्स...

मायक्रोमॅक्स Bharat 3, Bharat 4 स्मार्टफोन लॉंच, जाणून घ्या काय आहेत फिचर्स...

नवी दिल्ली, दि. 18 - भारतातील नामांकित कंपनी मायक्रोमॅक्सने ग्राहकांना परवडतील असे दोन 4G VoLTE स्मार्टफोन लॉंच केले आहेत. मायक्रोमॅक्स Bharat 3 आणि Bharat 4 अशी या दोन स्मार्टफोनची नावे असून यांची किंमत अनुक्रमे 4,499 व  4,999 रुपये इतकी आहे. भारतातील सर्व मोबाइल स्टोअरमध्ये या स्मार्टफोनची विक्री केली जाणार आहे. तसेच, या स्मार्टफोनमध्ये Android 7.0 Nougat ही ऑपरेटिंग सिस्टिम आणि यासोबतच भारतातील 22 भाषांचा समावेश करण्यात आला आहे. 
मायक्रोमॅक्स Bharat 3 या स्मार्टफोनमध्ये फिचर्स असे आहेत की, यामध्ये ड्युअल सिमची सुविधा देण्यात आली आहेत. तसेच, ऑपरेटिंग सिस्टिम Android 7.0 Nougat सोबतच एक जीबी रॅम आहे. तर, 4.5 इंचाच्या डिस्प्लेसह 480x854 पिक्सेल रिझॉल्युशन देण्यात आले आहे. याचबरोबर पाच मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि  पाच मेगापिक्सलचा  सेल्फी कॅमेरा सुद्धा आहे. यामध्ये 8 जीबी इंटरनल स्टोरेज मेमरी आणि 32 जीबीपर्यंतचे मायक्रो एसडी कार्डचा वापर करता येणार आहे. बॅटरी 2000mAh इतक्या क्षमतेची आहे. त्याबरोबर वाय-फाय, जीपीएस, ब्लूट्युथ, युएसबी ओटीजी आणि 4 जी कनेक्टिविटी मायक्रोमॅक्सच्या Bharat 3 या स्मार्टफोनमध्ये आहे. 
तर, दुसकीकडे मायक्रोमॅक्स Bharat 4 स्मार्टफोनमध्ये सुद्धा अशाच सुविधा देण्यात आल्या आहेत. फक्त डिस्प्ले आणि स्टोरेज मेमरी वाढविण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑपरेटिंग सिस्टिम Android 7.0 आहे. तसेच, ड्युअल सिमची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 5 इंचाच्या डिस्प्लेसह 720x1280 पिक्सेल रिझॉल्युशन देण्यात आले आहे. तर, स्मार्टफोन  Bharat 3 देण्यात आलेला पाच मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि पाच मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सुद्धा  Bharat 4 मध्ये देण्यात आला आहे. तर, 16 जीबी इंटरनल स्टोरेज आणि 32 जीबीपर्यंतचे मायक्रो एसडी कार्ड ग्राहकांना वापरता येणार आहे. बॅटरी  2500mAh इतक्या क्षमतेची आहे. शिवाय वाय-फाय, जीपीएस, ब्लूट्युथ, युएसबी ओटीजी आणि 4 जी कनेक्टिविटी Bharat 4 या स्मार्टफोनमध्ये आहे. 

मायक्रोमॅक्स Bharat 3 मधील फिचर्स...
1) ऑपरेटिंग सिस्टिम Android 7.0 Nougat 
2)  8 जीबी इंटरनल स्टोरेज मेमरी
3)  बॅटरी  2000mAh 
4)  पाच मेगापिक्सल रिअर कॅमेरा

मायक्रोमॅक्स Bharat 4 मधील फिचर्स...
1) ऑपरेटिंग सिस्टिम Android 7.0 
2)  16 जीबी इंटरनल स्टोरेज मेमरी
3)  बॅटरी  2500mAh 
4) पाच मेगापिक्सल  रिअर कॅमेरा
 

Web Title: Micromax Bharat 3, Bharat 4 Smartphone Launch, Learn What Are Factors ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल