चिनी कंपन्यांना झटका! स्वदेशी मायक्रोमॅक्स लवकरच सादर करणार लो बजेट स्मार्टफोन
By सिद्धेश जाधव | Published: April 18, 2022 07:34 PM2022-04-18T19:34:48+5:302022-04-18T19:35:10+5:30
Micromax In 2c स्मार्टफोन भारतात एप्रिलच्या शेवटी किंवा मेच्या सुरुवातीला सादर करण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे.
Micromax आपल्या लो बजेट स्मार्टफोन काम करत आहे, अशी बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. हा फोन लो बजेट सेगमेंटमध्ये Micromax In 2c नावाने भारतात लाँच केला जाईल, असं देखील सांगण्यात आलं होतं. आता अजून एका लीकमधून या स्वदेशी स्मार्टफोनच्या लाँचची माहिती समोर आली आहे. तसेच चिपसेटच्या कंपनीचं नाव देखील लीक झालं आहे.
Micromax In 2c स्मार्टफोन भारतात एप्रिलच्या शेवटी किंवा मेच्या सुरुवातीला सादर करण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे. हा एक बजेट फ्रेंडली स्मार्टफोन असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यात UNISOC चिपसेट दिला जाऊ शकतो. फोनच्या स्पेसिफिकेशन्सची किंवा किंमतीची माहिती मात्र समोर आली नाही.
जुन्या Micromax IN Note 2 चे स्पेसिफिकेशन्स
Micromax IN Note 2 स्मार्टफोनमध्ये 6.43-इंचाचा फुल एचडी+ अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या पंच होल डिस्प्लेला Corning Gorilla Glass ची सुरक्षा देण्यात आली आहे. हा फोन स्टॉक Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. प्रोसेसिंगसाठी मायक्रोमॅक्सच्या या फोनमध्ये मीडियाटेकचा ऑक्टा-कोर Helio G95 प्रोसेसर मिळतो. सोबत 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे.
मायक्रोमॅक्स इन नोट 2 स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 48MP चा प्रायमरी कॅमेरा आहे, सोबत 5MP ची अल्ट्रा-वाईड अँगल, 2MP मॅक्रो आणि 2MP चा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा सेन्सर मिळतो.
कनेक्टिव्हिटीसाठी या मायक्रोमॅक्स फोनमध्ये टाईप-सी पोर्ट, ड्युअल सिम, 4G, वीओएलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ 5.0 आणि जीपीएस देण्यात आलं आहे. सिक्योरिटीसाठी यात साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. IN Note 2 स्मार्टफोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 30W फास्ट चार्जिंगनं चार्ज करता येते.