Micromax IN Note 2: स्वदेशी स्मार्टफोन कंपनीची कमाल; 48MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह स्वस्त मोबाईल लाँच
By सिद्धेश जाधव | Updated: January 25, 2022 14:58 IST2022-01-25T14:57:33+5:302022-01-25T14:58:00+5:30
Micromax IN Note 2: स्वदेशी स्मार्टफोन कंपनीनं Micromax IN Note 2 स्मार्टफोन 48MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 4GB रॅमसह सादर केला आहे.

Micromax IN Note 2: स्वदेशी स्मार्टफोन कंपनीची कमाल; 48MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह स्वस्त मोबाईल लाँच
Micromax नं आपला नवीन स्मार्टफोन भारतात सादर केला आहे. स्वदेशी स्मार्टफोन कंपनीनं Micromax IN Note 2 स्मार्टफोन 48MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 4GB रॅमसह सादर केला आहे. हा फोन गेल्यावर्षी आलेल्या IN Note 1 ची जागा घेईल. हा नवीन मायक्रोमॅक्स फोन मोठ्याप्रमाणावर Samsung Galaxy S21 सीरीजमधील स्मार्टफोन्स सारखा दिसतो, परंतु याची किंमत बजेट फ्रेंडली आहे.
Micromax IN Note 2 ची किंमत
Micromax IN Note 2 स्मार्टफोनचा एकाच व्हेरिएंट कंपनीनं सादर केला आहे. ज्यात 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन भारतात 13,490 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे. परंतु लाँच ऑफर अंतर्गत कंपनी डिस्काउंट देत आहे. त्यामुळे 30 जानेवारीला विक्री सुरु झाल्यावर काही दिवस हा फोन 12,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा मायक्रोमॅक्सचा फोन Flipkart वर ब्लॅक आणि ओक अशा दोन रंगात उपलब्ध होईल.
Micromax IN Note 2 चे स्पेसिफिकेशन्स
Micromax IN Note 2 स्मार्टफोनमध्ये 6.43-इंचाचा फुल एचडी+ अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या पंच होल डिस्प्लेला Corning Gorilla Glass ची सुरक्षा देण्यात आली आहे. हा फोन स्टॉक Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. प्रोसेसिंगसाठी मायक्रोमॅक्सच्या या फोनमध्ये मीडियाटेकचा ऑक्टा-कोर Helio G95 प्रोसेसर मिळतो. सोबत 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे.
मायक्रोमॅक्स इन नोट 2 स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 48MP चा प्रायमरी कॅमेरा आहे, सोबत 5MP ची अल्ट्रा-वाईड अँगल, 2MP मॅक्रो आणि 2MP चा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा सेन्सर मिळतो.
कनेक्टिव्हिटीसाठी या मायक्रोमॅक्स फोनमध्ये टाईप-सी पोर्ट, ड्युअल सिम, 4G, वीओएलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ 5.0 आणि जीपीएस देण्यात आलं आहे. सिक्योरिटीसाठी यात साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. IN Note 2 स्मार्टफोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 30W फास्ट चार्जिंगनं चार्ज करता येते.
हे देखील वाचा:
- 22GB रॅम, 640GB स्टोरेजसह येतोय जगातील सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन; सॅमसंग-शाओमीलाही झेपलं नाही हे काम
- PF मधील पैसे काढायचे आहेत का? UMANG App वर काही क्लिक्समध्ये होईल काम