Micromax चा जोश पाहून चिनी कंपन्या बेहोश; दोन स्वस्त स्मार्टफोन लाँच

By हेमंत बावकर | Published: November 3, 2020 02:17 PM2020-11-03T14:17:52+5:302020-11-03T16:47:25+5:30

Micromax smartphone : कंपनीने दोन्ही फोनला 5000mAh बॅटरी देण्यात आली आहs. महत्वाचे म्हणजे दोन्ही फोनना टाईप सी चार्जिंग कनेक्टिविटी देण्यात आली आहे. 

Micromax Launch Micromax In Note 1, Micromax In 1B budget smartphone | Micromax चा जोश पाहून चिनी कंपन्या बेहोश; दोन स्वस्त स्मार्टफोन लाँच

Micromax चा जोश पाहून चिनी कंपन्या बेहोश; दोन स्वस्त स्मार्टफोन लाँच

Next

मोठ्या काळानंतर भारतीय स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्सनेभारतीय बाजारात पुनरागमन केले आहे. आज ऑनलाईन इव्हेंटमध्ये कंपनीने दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. Micromax In Note 1 आणि Micromax In 1B हे दोन बजेट फोन आणले आहेत. 


कंपनीने दोन्ही फोनला 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने Micromax In Note 1 डिव्हाईस दोन व्हेरिअंटमध्ये घेऊन आली आहे. यामध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज देण्यात आले असून किंमत 10,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर दुसरे व्हेरिअंट 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. याची किंमत 12,499 रुपटे ठेवण्य़ात आली आहे. 


दुसरा स्मार्टफोन Micromax In 1B ला 4 जीबी रॅम 64 जीबी स्टोरेजसह बाजारात आणण्यात आला आहे. या फोनची किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे. दुसरे व्हेरिअंट 2 जीबी रॅम  32 जीबी स्टोरेजचे आहे. याची किंमत 6,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि मायक्रोमॅक्सच्या वेबसाईटवर 24 नोव्हेंबरपासून उपलब्ध होणार आहेत. 


स्पेसिफिकेशंस

Micromax In Note 1 मध्ये 6.67 इंचाचा IPD LCD डिस्प्ले फुल HD+ रिझोल्युशनसह देण्यात आला आहे. हे डिव्हाईस MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे. गेमिंग करणाऱ्या युजरसाठी तो चांगला परफॉर्मन्स देतो. कॅमेरा सेटअप- AI क्वॉड रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये 48 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. तसेच 5 एमपी अल्ट्रा वाईड, २ एमपी मॅक्रो आणि २ एमपी डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. 5000एमएएच बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. अँड्रॉईड 10 ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली असून महत्वाचे म्हणजे अँड्रॉईड 11 आणि 12 अपडेट देण्य़ात येणार आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. 

Micromax In 1B ची किंमत खूपच परवडणारी ठेवण्यात आली आहे. 6.5 इंचाचा HD+ रिझोल्युशन डिस्प्ले देण्यात आला आहे. MediaTek चा Helio G35 प्रोसेसर देण्यात आला आहे. माठीमागे 13 मेगापिक्सल प्राइमरी सेंसरचा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये २ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 

महत्वाचे म्हणजे दोन्ही फोनना टाईप सी चार्जिंग कनेक्टिविटी देण्यात आली आहे. 

Web Title: Micromax Launch Micromax In Note 1, Micromax In 1B budget smartphone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.