स्वस्त झाला 48MP कॅमेरा असलेला स्वदेशी स्मार्टफोन Micromax In Note 1; जाणून घ्या नवीन किंमत 

By सिद्धेश जाधव | Published: September 29, 2021 07:20 PM2021-09-29T19:20:46+5:302021-09-29T19:20:58+5:30

Price cut on Micromax In Note 1: Micromax In Note 1 चा 4GB रॅम आणि 64GB व्हेरिएंट नव्या किंमतीत Flipkart वर लिस्ट करण्यात आला आहे.

Micromax in note 1 gets price cut in india  | स्वस्त झाला 48MP कॅमेरा असलेला स्वदेशी स्मार्टफोन Micromax In Note 1; जाणून घ्या नवीन किंमत 

स्वस्त झाला 48MP कॅमेरा असलेला स्वदेशी स्मार्टफोन Micromax In Note 1; जाणून घ्या नवीन किंमत 

googlenewsNext

मायक्रोमॅक्सने आपल्या बजेट स्मार्टफोन Micromax In Note 1 ची किंमत कमी केली आहे. कंपनीने या फोनच्या किंमतीत 1,500 रुपयांची कपात केली आहे. ही कपात या स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये करण्यात आली आहे. Micromax In Note 1 चा 4GB रॅम आणि 64GB व्हेरिएंट नव्या किंमतीत Flipkart वर लिस्ट करण्यात आला आहे. परंतु कंपनीने आपल्या वेबसाईटवर या फोनची किंमत बदलली नाही.  

Micromax In Note 1 ची नवीन किंमत 

Micromax In Note 1 चा 4GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट आता 9,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. याआधी या मॉडेलची किंमत 10,999 रुपये होती. तसेच फ्लिपकार्टच्या सेलमध्ये 3 ऑक्टोबरपासून ICICI आणि Axis बँकेच्या कार्डवर 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.  

Micromax In Note 1 स्पेसिफिकेशन्स  

Micromax In Note 1 मध्ये 6.67 इंचाचा IPD LCD डिस्प्ले फुल HD+ रिझोल्युशनसह देण्यात आला आहे. हे डिव्हाईस MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे. गेमिंग करणाऱ्या युजरसाठी तो चांगला परफॉर्मन्स देतो. कॅमेरा सेटअप- AI क्वॉड रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये 48 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. तसेच 5 एमपी अल्ट्रा वाईड, 2 एमपी मॅक्रो आणि २ एमपी डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. 5000एमएएच बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. अँड्रॉईड 10 ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली असून महत्वाचे म्हणजे अँड्रॉईड 11 आणि 12 अपडेट देण्य़ात येणार आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. 

Web Title: Micromax in note 1 gets price cut in india 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.