मायक्रोमॅक्स आणणार अजून एक लो बजेट स्मार्टफोन; Micromax IN Note 1 Pro चे स्पेसिफिकेशन्स लीक 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 07:31 PM2021-08-20T19:31:29+5:302021-08-20T19:34:38+5:30

Micromax In Note 1 Pro: कंपनी गेल्यावर्षी बाजारात आलेल्या In note 1 च्या अपग्रेड व्हर्जनवर काम करत आहे. हा फोन Micromax In Note 1 Pro असू शकतो, अशी चर्चा आहे.  

Micromax in note 1 pro spotted on geekbench with helio g90 chipset  | मायक्रोमॅक्स आणणार अजून एक लो बजेट स्मार्टफोन; Micromax IN Note 1 Pro चे स्पेसिफिकेशन्स लीक 

मायक्रोमॅक्स आणणार अजून एक लो बजेट स्मार्टफोन; Micromax IN Note 1 Pro चे स्पेसिफिकेशन्स लीक 

googlenewsNext

गेल्याच महिन्यात स्वदेशी स्मार्टफोन निर्माता कंपनी Micromax ने आपला Micromax In 2B स्मार्टफोन भारतात सादर केला होता. हा स्मार्टफोन गेल्यावर्षी लाँच झालेल्या Micromax In 1B चा अपग्रेड व्हर्जन होता. आता कंपनी गेल्यावर्षी बाजारात आलेल्या In note 1 च्या अपग्रेड व्हर्जनवर काम करत आहे. कंपनीचा अजून एक लो बजेट फोन गीकबेंचवर दिसला आहे. हा फोन Micromax In Note 1 Pro असू शकतो, अशी चर्चा आहे.  

गीकबेंच लिस्टिंगवरून या स्मार्टफोनच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. हा स्वदेशी स्मार्टफोन Micromax In Note 1 Pro नावाने लाँच होईल. हा बजेट स्मार्टफोन मॉडेल नंबर E7748 सह लिस्ट झाला आहे. याच मॉडेल नंबरसह हा फोन याआधी BIS या इंडियन सर्टिफिकेशन साईटवर लिस्ट करण्यात आला होता.  

गीकबेंच लिस्टिंगनुसार, या फोनमध्ये ऑक्टा-कोर MediaTek MT6785 प्रोसेसर देण्यात येईल. हा Helio G90 प्रोसेसरचा मॉडेल नंबर आहे. हा एक Android 10 ऑपरेटिंग सिस्टमवर चालणार स्मार्टफोन असेल. गिकबेंच टेस्टमध्ये या स्मार्टफोनला सिंगल कोरमध्ये 519 आणि मल्टी कोर टेस्टमध्ये 1673 पॉईंट्स मिळाले आहेत.  

Micromax In 2B चे स्पेसिफिकेशन्स  

मायक्रोमॅक्स इन 2बी मध्ये तिन्ही बाजूंनी बेजल लेस असलेला वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले मिळतो. हा एक 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे जो 400निट्स ब्राइटनेस देतो. या मायक्रोमॅक्स स्मार्टफोनमध्ये 2 ARM Cortex A75 CPU असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह Unisoc T610 चिपसेट आणि अँड्रॉइड 11 ओएस देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये जी52 जीपीयू मिळतो.   

Micromax In 2B च्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सरसह एक 2 मेगापिक्सलची सेकंडरी एआय लेन्स कंपनीने दिली आहे. या मायक्रोमॅक्स फोनमध्ये 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा आहे. Micromax In 2B मध्ये रियर फिंगरप्रिंट सेन्सरसह फेस अनलॉक फिचर देखील मिळते. या मायक्रोमॅक्स स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी आहे.   

Web Title: Micromax in note 1 pro spotted on geekbench with helio g90 chipset 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.