'मायक्रोमॅक्स सेल्फी 2' स्मार्टफोन भारतात लॉंच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 05:59 PM2017-07-31T17:59:36+5:302017-07-31T18:00:13+5:30
सध्या अनेक कंपन्या आपले नव-नवीन स्मार्टफोन मोबाईल मार्केटमध्ये घेऊन येत आहेत. मायक्रोमॅक्स या कंपनीने मायक्रोमॅक्स सेल्फी 2 हा स्मार्टफोन भारतात आणला आहे.
मुंबई, दि. 31 - सध्या अनेक कंपन्या आपले नव-नवीन स्मार्टफोन मोबाईल मार्केटमध्ये घेऊन येत आहेत. मायक्रोमॅक्स या कंपनीने मायक्रोमॅक्स सेल्फी 2 हा स्मार्टफोन भारतात आणला आहे. या स्मार्टफोनमध्ये नवे फीचर्स आणले असून सेल्फी कॅमे-याच्या दृष्टीने हा स्मार्टफोन बनविण्यात आला आहे, म्हणून या स्मार्टफोनला मायक्रोमॅक्स सेल्फी 2 असे नाव दिले आहे. याचबरोबर लेटेस्ट अँड्रॅाईड सॉफ्टवेअर आणि फिंगरप्रिन्ट स्कॅनर सपोर्ट देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत भारतात 9,999 इतकी आहे. तर, उद्यापासून म्हणजेच एक ऑगस्टपासून देशातील सर्व महत्वाच्या दुकानांमधून या स्मार्टफोनची विक्री करण्यात येणार आहे. मायक्रोमॅक्स सेल्फी 2 या स्मार्टफोनचा लूकआऊट सुद्धा सुंदर असून मेटॅलिक बॉडी देण्यात आली आहे. होम बटन समोर दिले नाही, तर व्हॅल्यूम आणि पॉवर बटन डाव्या साईडला दिले आहे.
मायक्रोमॅक्स सेल्फी 2 ची किंमत आणि ऑफर्स ...
देशातील सर्व मोबाईल विक्रेत्यांजवळ उद्यापासून म्हणजे एक ऑगस्टपासून मायक्रोमॅक्स सेल्फी 2 स्मार्टफोन उपलब्ध असणार आहे. या स्मार्टफोनची किंमत 9,999 रुपये इतकी असून 100 दिवसांची रिप्लेसमेंट गॅरंटी सुद्धा देण्यात आली आहे. या गॅरेंटीमध्ये मायक्रोमॅक्सने स्मार्टफोनचे काहीही नुकसान झाले तरी रिप्लेस करण्याचे आश्वासन दिले आहे.
काय आहेत फिचर्स ...
- ऑपरेटिंग सिस्टिम Android 7.0 Nougat
- 5.1 इंच एचडी डिस्प्ले
- 2.5 जी कव्हर्ड ग्लास पोर्टक्शन
- 1.3GHz quad-core MediaTek MT6737 SoC
- 3 जीबी DDR3 रॅम
- 32 जीबी इंटरनल स्टोरेज मेमरी
- 13 मेगापिक्सल सेन्सरसोबत एलईडी फ्लॅश सपोर्ट
- 3000mAh बॅटरी