30 जुलैला लाँच होणार Micromax चा स्वस्त स्मार्टफोन; देणार का चिनी ब्रँड्सना आव्हान?
By सिद्धेश जाधव | Published: July 20, 2021 07:37 PM2021-07-20T19:37:30+5:302021-07-20T19:40:35+5:30
Micromax IN series launch: माइक्रोमॅक्सचा आगामी फोन 30 जुलैला Micromax IN सीरीजमध्ये सादर केला जाईल.
भारतीय स्मार्टफोन निर्माता Micromax लवकरच भारतात आपला नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. कंपनी आपल्या Micromax In सीरिजमध्ये हा नवीन फोन लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. माइक्रोमॅक्सने या फोनची अधिकृतपणे घोषणा केली आहे आणि सांगितले आहे कि, कंपनीचा आगामी फोन 30 जुलैला Micromax IN सीरीजमध्ये सादर केला जाईल.
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, स्वदेशी कंपनी माइक्रोमॅक्स 30 जुलैला नवीन Micromax In 2B स्मार्टफोन लाँच करणार आहे. त्यानंतर Micromax In 2C स्मार्टफोन ऑगस्टमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या आसपास लाँच करू शकते.
Micromax In 2B चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
Micromax lN 2B स्मार्टफोन गीकबेंच साइटवर लिस्ट झाला आहे, असे Gizmochina च्या रिपोर्टमधून समोर आले आहे. या लिस्टिंगनुसार, माइक्रोमॅक्स इन 2बी अँड्रॉइड 11 सह सादर केला जाईल. तसेच फोनमध्ये Unisoc T-610 प्रोसेसर मिळू शकतो. सोबत Mali-G52 GPU मिळू शकतो. त्याचबरोबर फोनमध्ये 4 जीबी रॅम देण्यात येईल. इतकेच नव्हे तर गीकबेंच लिस्टिंगमध्ये माइक्रोमॅक्स इन 2बी फोनला सिंगल कोरमध्ये 350 आणि मल्टी-कोरमध्ये 1204 स्कोर मिळालाआहे.
Micromax IN 2C चे स्पेसिफिकेशन्स
काही दिवसांपूर्वी Micromax IN 2C देखील गीकबेंचवर दिसला होता. गीकबेंच लिस्टिंगवर Micromax IN 2C स्मार्टफोन Unisoc T-610 चिपसेटसह लिस्ट करण्यात आला आहे. माइक्रोमॅक्सच्या या फोनमध्ये Mali-G52 GPU देण्यात येईल बेंचमार्क लिस्टिंगनुसार यात 4GB RAM आणि Android 11 ऑपरेटिंग सिस्टम असेल. Micromax IN 2C स्मार्टफोनला सिंगल कोर टेस्टमध्ये 347 पॉइन्ट स्कोर आणि मल्टी कोर टेस्टमध्ये 1,127 पॉइन्ट्स मिळाले आहेत.