Microsoft ने लाँच केले स्वस्तात मस्त लॅपटॉप !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 05:41 PM2018-01-24T17:41:29+5:302018-01-24T17:42:18+5:30

आयटी क्षेत्रातील नामांकित कंपनी मायक्रोसॉफ्टने चार नवीन लॅपटॉप लाँच केले आहेत. हे लाँच करण्यात आलेले चारही लॅपटॉपची ऑपरेटिंग सिस्टिम विंडोज 10 आहे. खासकरुन विद्यार्थांच्या उपयोगात येतील, अशाप्रकारे या लॅपटॉपची निर्मिती करण्यात आली. यामध्ये दोन लॅपटॉप लेनोव्हो आणि दोन लॅपटॉप जेपीद्वारे विकसित करण्यात आले आहेत.

Microsoft launches the cheapest laptop! | Microsoft ने लाँच केले स्वस्तात मस्त लॅपटॉप !

Microsoft ने लाँच केले स्वस्तात मस्त लॅपटॉप !

Next

मुंबई : आयटी क्षेत्रातील नामांकित कंपनी मायक्रोसॉफ्टने चार नवीन लॅपटॉप लाँच केले आहेत. हे लाँच करण्यात आलेले चारही लॅपटॉपची ऑपरेटिंग सिस्टिम विंडोज 10 आहे. खासकरुन विद्यार्थांच्या उपयोगात येतील, अशाप्रकारे या लॅपटॉपची निर्मिती करण्यात आली. यामध्ये दोन लॅपटॉप लेनोव्हो आणि दोन लॅपटॉप जेपीद्वारे विकसित करण्यात आले आहेत. दरम्यान, या मायक्रोसॉफ्टच्या नवीन लॅपटॉपमुळे बाजारात क्रांती घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांच्या उपयोगासाठी लॉंच करण्यात आलेल्या या लॅपटॉपचे नाव Lenovo 100e असे असून याची किंमत 189 डॉलर (जवळपास 12,100 रुपये) इतकी आहे. यामध्ये दोन व्हेरियंट असून दोन जीबी रॅम, 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजमध्ये आहे. तसेच, या लॅपटॉमध्ये 11.6 इंच एचडी एंटीग्लेयर डिस्प्ले देण्यात आला आहे. या लॅपटॉपचे वजन 1.22 किलो आहे. याचबरोबर, कंपनीने असा दावा केला आहे, की या लॅपटॉपची बॅटरी लाइफ 10 तासांची आहे. याशिवाय लेनोव्होने आणखी एक लॅपटॉप बाजारात आणला आहे. Lenovo 300e असे या लॅपटॉपचे नाव असून याची किंमत 279 डॉलर (जवळपास 17,800 रुपये) इतकी आहे. तसेच, 11.6 इंचाचा मल्टीटच डिस्प्ले आहे. याचे रेजोल्यूशन  1366×768 पिक्सल आहे. यामध्ये एक इंटेल पेंटियम प्रोसेसर आणि 4 जीबी एलपीडीडीआर 4 रॅम आणि 16 जीबी ईएमएमसी स्टोरेज मेमरी आहे. याचबरोबर, आणखी दोन लॅपटॉप आहेत. जे जेपीने तयार केलेले खासकरुन एज्युकेशन रेंजमध्ये आहेत. Classmate Leap T303 आणि  Trigono V401 अशी यांची नावे आहेत. Classmate Leap T303 या लॅपटॉपची किंमत जवळपास12,700 रुपये आहे, तर Trigono V401ची किंमत जवळपास 19,100 रुपयांपर्यंत आहे.
दरम्यान, मायक्रोसॉफ्टने देशातील 146 शिक्षकांना Office 365 Education चे मोफत एक्सेस ऑफर करण्याची योजना आखली आहे. यामध्ये संबंधित शैक्षणिक अपडेट सतत होत राहतील. 
 

Web Title: Microsoft launches the cheapest laptop!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.