'मायक्रोसॉफ्ट'नं लाँच केला सर्वात स्वस्त लॅपटॉप, किंमत फक्त १८ हजार रुपये!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 05:17 PM2021-11-10T17:17:58+5:302021-11-10T17:21:34+5:30

मायक्रोसॉफ्टनं (Microsoft) एक स्वस्त आणि मस्त लॅपटॉप बाजारात आणला आहे. Surface Laptop SE असं या लॅपटॉपचं नाव देण्यात आलं आहे.

microsoft launches cheapest student focused surface laptop se | 'मायक्रोसॉफ्ट'नं लाँच केला सर्वात स्वस्त लॅपटॉप, किंमत फक्त १८ हजार रुपये!

'मायक्रोसॉफ्ट'नं लाँच केला सर्वात स्वस्त लॅपटॉप, किंमत फक्त १८ हजार रुपये!

Next

मायक्रोसॉफ्टनं (Microsoft) एक स्वस्त आणि मस्त लॅपटॉप बाजारात आणला आहे. Surface Laptop SE असं या लॅपटॉपचं नाव देण्यात आलं आहे. यात Windows 11 हे अत्याधुनिक व्हर्जन देण्यात आलं आहे आणि ते खासकरुन शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या दृष्टीकोनातून डिझाइन करण्यात आलं आहे. 

मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या दाव्यानुसार Surface Laptop SE हा कंपनीचा सर्वात स्वस्त लॅपटॉप असणार आहे. याची किंमत २४९ यूएस डॉलर्स (जवळपास १८,५२३ रुपये) इतकी आहे. पुढील वर्षापासून या लॅपटॉपची विक्री सुरू होणार आहे. 

कंपनीनं सध्या शालेय शिक्षण पद्धतीनुसार लॅपटॉप डिझाइन करण्याकडे भर दिला आहे. ई-लर्निंगचा ट्रेंड सध्या खूप वाढला आहे आणि लहानमुलांपासून ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्यांपर्यंत सर्वजण आता ऑनलाइन शिक्षणाकडे वळू लागले आहेत. त्यामुळे याच बाजारावर कब्जा मिळवण्यासाठी टेक कंपन्याही जोरदार कामाला लागल्या आहेत. याच प्रकारात एक पाऊल पुढे टाकत मायक्रोसॉफ्टनं स्वस्त लॅपटॉप आणला आहे. 

Surface Laptop SE मध्ये ११.६ इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. तर स्क्रीन रिज्योलुशन 1366x768 पिक्सल असं असणार आहे. यात Intel Celeron N4020 प्रोसेसर देण्यात आला आहे. याशिवाय लॅपटॉप 4GB आणि 8GB रॅमच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. 64GB आणि 128GB इंटरनल मेमरी पर्याय उपलब्ध असणार आहे. त्यासोबत लॅपटॉपला १ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. सिंगल USB A पोर्ट, USB Type C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 

लॅपटॉप १०० टक्के चार्ज झाल्यानंतर १६ तासांची बॅटरी लाइफ देईल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. सध्या हा लॅपटॉप सुरुवातीला अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि जपानच्या बाजारात उपलब्ध करुन दिला जाईल. त्यानंतर इतर देशांमध्ये लॉन्च केला जाणार आहे. भारतात हा लॅपटॉप नेमका केव्हा उपलब्ध होणार याबाबत अद्याप कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 

Web Title: microsoft launches cheapest student focused surface laptop se

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.