Microsoft चं नवं फीचर, पासवर्डशिवाय करता येणार लॉग इन!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 10:41 AM2019-07-15T10:41:17+5:302019-07-15T10:51:46+5:30

जगातील प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्ट अकाऊंट पासवर्डशिवाय लॉग करता येईल यासाठी एका नव्या फीचरवर सध्या काम करत आहे. 

microsoft windows 10 microsoft bring news feature passwordless login know how to use latest | Microsoft चं नवं फीचर, पासवर्डशिवाय करता येणार लॉग इन!

Microsoft चं नवं फीचर, पासवर्डशिवाय करता येणार लॉग इन!

Next
ठळक मुद्देमायक्रोसॉफ्टचं हे नवं फीचर विंडोज 10 इनसायडर प्रीव्यू बिल्ड 18936 मध्ये देण्यात आले आहे.पासवर्ड लेस लॉग इन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर विंडोज 10 युजर्सना अपडेटच्या माध्यमातून फीचर देण्यात येणार 'मायक्रोसॉफ्ट' आता लॉग इन करण्याच्या रेग्युलर प्रोसेस व्यतिरिक्त पासवर्डशिवाय लॉग इन करण्याच्या प्रोसेसवर काम करत आहे.

नवी दिल्ली - जगातील प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्ट अकाऊंट पासवर्डशिवाय लॉग करता येईल यासाठी एका नव्या फीचरवर सध्या काम करत आहे. मायक्रोसॉफ्टचं हे नवं फीचर विंडोज 10 इनसायडर प्रीव्यू बिल्ड 18936 मध्ये देण्यात आले आहे. पासवर्ड लेस लॉग इन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर विंडोज 10 युजर्सना अपडेटच्या माध्यमातून फीचर देण्यात येणार आहे.

'मायक्रोसॉफ्ट' आता लॉग इन करण्याच्या रेग्युलर प्रोसेस व्यतिरिक्त पासवर्डशिवाय लॉग इन करण्याच्या प्रोसेसवर काम करत आहे. सर्व मायक्रोसॉफ्ट अकाऊंट पासवर्डशिवाय लॉग इन करण्यासाठी विंडोज हॅलो फेस, फिंगरप्रिंट किंवा पिनचा वापर करता येणार आहे. जर युजर्सकडे विंडोज हॅलो सेटअप नसेल तर मायक्रोसॉफ्टच्या वॉक थ्रूच्या माध्यमातून सेटअप करता येईल. 

पासवर्डशिवाय असं करा लॉग इन 

- पासवर्ड लॉग इन करण्यासाठी सेटींगमध्ये जा.

- अकाऊंट ऑप्शनवर क्लिक करा. 

- साइन इन वर क्लिक करा.

-  मेक यूअर डिव्हाईस पासवर्डलेस हे ऑन करा. 

- अशा प्रकारे आपलं मायक्रोसॉफ्ट अकाऊंट पासवर्डशिवाय लवकरच लॉग इन करता येणार आहे.

मायक्रोसॉफ्टने स्वतः ची कॉम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीम Windows 7 चा मेनस्ट्रीम सपोर्ट बंद केल्यानंतर त्याचा एक्सटेंडेट सपोर्ट (अपडेट्स) सुद्धा बंद करण्यात येणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी दिली होती. मायक्रोसॉफ्टने Windows 7 ला नव्या फीचर्सशी जोडण्याआधीच हा निर्णय घेतल्याने तंत्रज्ञान जगतात खळबळ उडाली. 14 जानेवारी 2020 पर्यंत मायक्रोसॉफ्ट एक्सटेंडेड सपोर्टही बंद करण्याची शक्यता आहे. 

एक्सटेंडेड सपोर्ट बंद केल्यानंतरही कॉम्प्युटर काम करणं सुरूच ठेवणार आहे. परंतु युजर्सला यात सुरक्षा अपडेट्स मिळणं बंद होणार आहे. तसेच 20 जानेवारी 2020 नंतरही Windows 7 इन्स्टॉलेशन आणि अ‍ॅक्टिव्हेशन करता येणार आहे. परंतु Windows 7 वापरणं युजर्ससाठी धोक्याचं ठरू शकतं, अशी सूचनाही कंपनीने दिली आहे. कारण Windows 7मध्ये आपल्याला सुरक्षाच फीचर्स आणि व्हायरसपासून बचावासाठी कोणतीही यंत्रणा देण्यात आलेली नाही. त्यामुळे कंपनीनं युजर्सला Windows 7 ला Windows 10 मध्ये (अपग्रेड) अद्ययावत करण्याचा सल्ला दिला आहे. देशातील जास्त करून कॉम्प्युटर आणि एटीएम मशिन्समध्ये Windows 7 ही ऑपरेटिंग सिस्टीम वापरली जाते.

Windows 7 मध्ये अपडेट्स येणं बंद झाल्यास सुरक्षेचा मोठा धोका उद्भवू शकतो. तसेच कॉम्प्युटर आणि एटीएम मशिनमधल्या सुरक्षेचा डेटा चोरी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मायक्रोसॉफ्टने 2015मध्ये Windows 10 लाँच केले होते. परंतु Windows 7 युजर्सला वापरण्यासाठी सोयीस्कर वाटत होते. त्यामुळेच Windows 10 ऐवजी Windows 7 युजर्स वापरत होते. Windows 10 वापरणारे 70 कोटी युजर्स आहेत. त्यातच वेब अ‍ॅनालिटिक्स फर्म स्टेटकाउंटर आणि नेटमॅमार्केट्सनेही सर्वात प्रसिद्ध ऑपरेटिंग सिस्टीम असल्याचे सांगितले आहे.

 

Web Title: microsoft windows 10 microsoft bring news feature passwordless login know how to use latest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.