ॲप बनवणार करोडपती! २०० रुपयांच्या खर्चावर १ कोटींचा फायदा, मोदी सरकारची योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 06:26 PM2023-09-03T18:26:24+5:302023-09-03T18:27:03+5:30

'मेरा बील मेरा अधिकार' या योजने अंतर्गत तुम्ही लखपती होऊ शकता.

Millionaires will make apps! 1 Crore benefit at a cost of Rs 200, Modi government's scheme | ॲप बनवणार करोडपती! २०० रुपयांच्या खर्चावर १ कोटींचा फायदा, मोदी सरकारची योजना

ॲप बनवणार करोडपती! २०० रुपयांच्या खर्चावर १ कोटींचा फायदा, मोदी सरकारची योजना

googlenewsNext

तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये एक अॅप इस्टॉल करुन लखपती होऊ शकता. हे सरकारी अॅप आहे, यावरुन तुम्हाला फक्त तुम्ही व्यवहार केलेल्या बिलाचा फोटो अपलोड करायचा आहे. तुम्ही 'मेरा बील, मेरा अधिकार' या अॅप बद्दल ऐकलं असेल. Google Play Store वर 'मेरा बिल मेरा अधिकार' हे अॅप सर्च करुन तुमच्या मोबाइलवर डाऊनलोड करा. मोदी सरकारची ही नवीन योजना आहे, यामध्ये तुम्ही २०० रुपयांच्या GST बिलासह १ कोटी रुपये जिंकू शकता. 

तुम्‍ही 'मेरा बिल मेरा अधिकार' लकी ड्रॉचे विजेते झाल्‍यास, तुम्‍हाला ३० दिवसांच्‍या आत अॅपवर पॅन क्रमांक, आधार कार्ड क्रमांक आणि बँक खाते तपशील द्यावा लागेल. यानंतर, बक्षिसाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल.

रिलायन्सला पहिल्याच आठवड्यात झटका! ३८,४९५ कोटींचे नुकसान, Airtel, SBI'लाही धक्का

१ सप्टेंबर २०२३ रोजी केंद्रातील मोदी सरकारने 'मेरा बिल मेरा अधिकार' ही योजना सुरू केली. यामध्ये भारतातील सर्व नागरिक सहभागी होऊ शकतात. योजनेअंतर्गत अनेक लकी ड्रॉ काढण्यात येणार आहेत. यामध्ये किमान २०० रुपयांच्या बिलाचा फोटो अपलोड करून जास्तीत जास्त १ कोटी रुपये जिंकता येतील.

ही योजना आसाम, गुजरात, हरियाणा आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी, दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीवसाठी सुरू करण्यात आली आहे. ही योजना एक वर्षासाठी सुमारे १२ महिने सुरू राहणार आहे.

या योजनेअंतर्गत दर तीन महिन्यांनी दोन बंपर बक्षिसे काढली जातील. याची कमाल किंमत एक कोटी रुपये असेल. तसेच १० लाख रुपयांचे मासिक १० लकी ड्रॉ काढले जातील. १०,००० रुपयांचे तेच ८०० मासिक लकी ड्रॉ काढले जाणार आहे.

बील असं अपलोड करा

अगोदर तुम्हाला 'मेरा बिल मेरा अधिकार' अॅप डाउनलोड करावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्या बिलाचे इनव्हॉइस अपलोड करावे लागेल.
यासाठी तुम्हाला My Invoice या पर्यायावर जावे लागेल, जिथे तुम्हाला कॅमेरा, गॅलरी आणि PDF असे तीन पर्याय मिळतील. तुम्ही बिल इनव्हॉइस फोटो, गॅलरी किंवा पीडीएफ फॉरमॅटमध्ये अपलोड करू शकाल. यानंतर, तुमच्या बिलाचे सर्व तपशील जसे की CGST, SGST आणि इतर व्यवहार तपशील त्यात भरा. यानंतर सबमिट इनव्हॉइस वर क्लिक करावे लागेल. तुम्हाला बदल करायचा असल्यास त्यात बदल करू शकता. यानंतर अपलोड केले जाईल. आणि ARN जनरेट होईल.

यात तपशीलांसह NRN माय इनव्हॉइस विभागात उपलब्ध असेल. बक्षीस जिंकण्यासाठी वापरकर्त्यांना हार्ड कॉपी सुरक्षित ठेवावी लागेल.

Web Title: Millionaires will make apps! 1 Crore benefit at a cost of Rs 200, Modi government's scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.