गुगलच्या डूडलमध्ये आज मिर्झा गालिब, शेर-ओ-शायरीच्या बादशाहला मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 09:01 AM2017-12-27T09:01:51+5:302017-12-27T10:22:38+5:30

गुगलने शेर-ओ-शायरीचा बादशाहाला अर्थात मिर्झा गालिब यांना डूडलच्या माध्यमातून मानवंदना दिली आहे.

Mirza Ghalib, Sara-o-Shayari's Emperor's King today, in Google's doodle | गुगलच्या डूडलमध्ये आज मिर्झा गालिब, शेर-ओ-शायरीच्या बादशाहला मानवंदना

गुगलच्या डूडलमध्ये आज मिर्झा गालिब, शेर-ओ-शायरीच्या बादशाहला मानवंदना

Next
ठळक मुद्दे गुगलने शेर-ओ-शायरीचा बादशाहाला अर्थात मिर्झा गालिब यांना डूडलच्या माध्यमातून मानवंदना दिली आहे. मिर्जा गालिब यांची आज 220 वी जयंती आहे.

मुंबई- गुगलने शेर-ओ-शायरीचा बादशाहाला अर्थात मिर्झा गालिब यांना डूडलच्या माध्यमातून मानवंदना दिली आहे. मिर्झा गालिब यांची आज 220 वी जयंती आहे. याच निमित्ताने गूगलने खास डूडल तयार करुन मिर्जा गालिब यांना अभिवादन केलं आहे. मिर्झा गालिब यांचं पूर्ण नाव मिर्झा असल-उल्लाह बेग खां 27 डिसेंबर 1797 रोजी आग्र्यातील काळा महालमध्ये गालिब यांचा जन्म झाला. तेव्हा भारतात मुघलांचे राज्य होते.. मिर्जा गालिब यांनी पारसी, उर्दू आणि अरबी भाषेत अभ्यास केला.

गुगलच्या डूडलमध्ये मिर्झा गालिब यांच्या हातात पेन आणि कागद दिसतो आहे. त्यांच्या मागे साकारण्यात आलेली इमारत मुघलकालीन वास्तूकलेचं दर्शन घडवते आहे. मुघलकालीन भिंती, त्यावरील आकर्षक रचना, सूर्य आणि पिवळसर प्रकाश अशा पार्श्वभूमीवर मिर्झा गालिब यांचं पूर्ण चित्र डूडलने साकारलं आहे. 

अत्यंत हालाखीच्या स्थितीत मिर्जा गालिब यांचं बालपण गेलं. संपूर्ण आयुष्य एका संघर्षाच्या उन्हातच त्यांनी घालवलं. आर्थिक संकटांनी तर त्यांना बेजार केलं. मात्र जगण्यातले चटकेही त्यांनी शब्दबद्ध केले. शायरीतून व्यक्त केले.
लहान असतानाच गालिब यांचं पितृछत्र हरपलं. त्यानंतर त्यांची काकांनी त्यांना सांभाळलं. मात्र त्यांचा आधारही त्यांना फार काळ मिळाला नाही. वयाच्या 13 व्या वर्षी उमराव बेगम यांच्या विवाह झाला आणि ते दिल्लीत आले. त्यानंतरचं संपूर्ण आयुष्य दिल्लीतच गेलं. मुघल काळातील शेवटचा सत्ताधारी बहादुर शाह जफर याच्या दरबारात कवी म्हणूनही ते राहिले.

इश्क, मोहब्बत, वफा, लफ्ज... अशा असंख्य शब्दांमधून जगण्याचं तत्त्वज्ञान सांगणाऱ्या गालिब यांचं निधन वयाच्या 71 व्या वर्षी म्हणजे 15 फेब्रुवारी 1869 रोजी दिल्लीतील चांदनी चौक भागातील गली कासिम जानमध्ये झालं. आता या भागाला 'गालिब की हवेली' म्हटलं जातं.
 

Web Title: Mirza Ghalib, Sara-o-Shayari's Emperor's King today, in Google's doodle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.