माेबाइल डेटा वापरात भारतीयांची गाडी सुसाट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 11:02 AM2023-01-01T11:02:37+5:302023-01-01T11:02:59+5:30
वेगवान डाउनलाेडमुळे माेबाइल इंटरनेट वापरकर्त्यांचा डेटा वापरही अननेक पटींनी वाढणार आहे.
नवी दिल्ली : माेबाइलच्या क्षेत्रात २०२२ मध्ये ५जी युगाला सुरूवात झाली. नव्या वर्षात देशातील बहुतांश शहरांमध्ये ५जी नेटवर्क उपलब्ध हाेणार आहे. सध्याच्या ४जीच्या तुलनेत १५ ते २० पट अधिक वेग ५जीमध्ये मिळणार आहे. वेगवान डाउनलाेडमुळे माेबाइल इंटरनेट वापरकर्त्यांचा डेटा वापरही अननेक पटींनी वाढणार आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये सरासरी दरमहा डेटा वापर (एमबी)
२०१७ ५,७२८
२०१८ ९,६५३
२०१९ ११,१८३
२०२० १३,४६२
२०२१ १७,०४५
४ जीच्या युगात गेल्या पाच वर्षांमध्ये सरासरी दरमहा डेटा वापर ३ पटींहून अधिक वाढला आहे.
सरासरी डाउनलाेड
वेग (एमबीपीएस)
२जी - ०.१ ३जी - ३
४जी - १८ ५जी - २४२