स्मार्टफोनबाबत 'या' ५ चुका कधीही विसरू नका, नाहीतर मोबाइलचा स्फोट होऊ शकतो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 04:14 PM2022-07-30T16:14:53+5:302022-07-30T16:15:11+5:30

स्मार्टफोनचा स्फोट होणे ही समस्या तर आहेच पण यामुळे केवळ पैसेच वाया जात नाहीत तर फोनमधील डेटा आणि सिम इत्यादी देखील वाया जातात.

mobile explode 5 mistakes smartphone blast reasons | स्मार्टफोनबाबत 'या' ५ चुका कधीही विसरू नका, नाहीतर मोबाइलचा स्फोट होऊ शकतो

स्मार्टफोनबाबत 'या' ५ चुका कधीही विसरू नका, नाहीतर मोबाइलचा स्फोट होऊ शकतो

Next

स्मार्टफोनचा स्फोट होणे ही समस्या तर आहेच पण यामुळे केवळ पैसेच वाया जात नाहीत तर फोनमधील डेटा आणि सिम इत्यादी देखील वाया जातात. त्यामुळेच मोबाईलमध्ये स्फोट का होतो याची कारणं समजून घेणं खूप महत्वाचं आहे. वास्तविक काही वेळा युजर्सच्या चुकीमुळे मोबाईलला आगही लागते. ही कारणे जाणून घेऊया.

थर्ड पार्टी चार्जरः बर्‍याचदा लोक थर्ड पार्टी चार्जर वापरतात, जे मोबाईलला आग लागण्याचे एक प्रमुख कारण आहे, ज्यामुळे बॅटरीचा स्फोट होतो. थर्ड पार्टी चार्जरमध्ये बरेच पार्ट नसतात, त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत फोनचे हार्डवेअर खराब होऊ शकते किंवा चार्जिंग दरम्यान, त्याचे तापमान वाढू शकतं. यामुळेच स्मार्टफोनचा स्फोट होण्याची दाट शक्यता असते. 

ओव्हर हिटिंगपासून बचाव: स्मार्टफोन अनेकदा गरम होतात आणि चार्जिंग दरम्यान ही समस्या मोठं रूप धारण करू शकते. अशा परिस्थितीत फोनचे तापमान नियंत्रणात ठेवलं पाहिजे हे लक्षात ठेवा. यासाठी तुम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या स्मार्टफोनचे कुलिंग पॅड देखील वापरू शकता.

फोनला जास्तवेळ सूर्यप्रकार ठेवू नका: स्मार्टफोनला तासनतास थेट सूर्यप्रकाशात ठेवू नका. अशा स्थितीत स्मार्टफोनचे तापमान वेगाने वाढू शकते आणि त्याची बॅटरी फुटू शकते.

मॅन्युफॅक्टरिंग फॉल्ट: अनेक वेळा कंपनीच्या चुकीमुळे स्मार्टफोनला आग लागते आणि त्याची बॅटरी फुटते. अलीकडे वनप्लस फोनला आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत.

यूझर्सची चूक: अनेकदा यूझर्सच्या चुकीच्या वापरामुळे स्मार्टफोन पेटतो. अशा परिस्थितीत वर नमूद केलेल्या सर्व गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे आणि ही सर्व संभाव्य कारणे आहेत.

Web Title: mobile explode 5 mistakes smartphone blast reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.