चार्जिंग करताना मोबाइल हॅक; ज्यूस जॅकिंगच्या माध्यमातून होतेय फसवणूक; जाणून घ्या काय आहे प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 05:32 AM2021-08-09T05:32:53+5:302021-08-09T05:33:17+5:30
मोबाइलचे चार्जिंग संपले की, तो रिचार्ज करण्यासाठी चार्जरचा वापर केला जातो. बाहेर असलो आणि चार्जर नसला तर चार्जिंग पॉइंट ...
मोबाइलचे चार्जिंग संपले की, तो रिचार्ज करण्यासाठी चार्जरचा वापर केला जातो. बाहेर असलो आणि चार्जर नसला तर चार्जिंग पॉइंट शोधून चार्जिंग करण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, या चार्जिंग पोर्टच्या माध्यमातून मोबाइलमधील महत्त्वाच्या फाइल्स आणि डेटा चोरला जाण्याची शक्यता असते.
काय आहे मोडस ऑपरेंडी?
मोबाइलचे चार्जिंग करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पोर्टच्या माध्यमातूनही हॅकिंग केले जाते. या प्रकाराला ज्यूस जॅकिंग असे म्हणतात. सायबर चोरीचाच हा प्रकार आहे. एकदा का मोबाइलमध्ये या मालवेअरने शिरकाव केला की, त्यावर लांबून नियंत्रण ठेवणे चोरांना सोपे जाते.
कोणत्याही अनोळखी, अज्ञात अशा चार्जिंग पोर्टवर मोबाइल चार्जिंगला लावला की, त्यात दडवून ठेवलेले मालवेअर किंवा स्पाय ॲप्स मोबाइलमध्ये शिरतात.
मोबाइलमध्ये सेव्ह केलेला डेटा, पासवर्ड्स, महत्त्वाचे ई-मेल वा आर्थिक व्यवहारांची माहिती चोरांच्या हाती सहज लागते. आणि फसवणूक सुरू होते.
फोन, टॅब, लॅपटॉप या उपकरणांमध्ये ज्यूस जॅकिंग करता येऊ शकते.
काय काळजी घ्यावी?
कोणत्याही ठिकाणी मोबाइल चार्जिंग करू नका. शक्यतो बॅटरी बॅकअप स्वत:सोबत घेऊन फिरा.
अगदीच अडचण आली तर ओळखीच्या व्यक्तीकडूनच चार्जर घ्या. अनोळखी व्यक्तीची यूएसबी कॉड वापरू नका.
अद्याप तरी ज्यूस जॅकिंगमुळे कोणाची फसवणूक झाल्याची तक्रार निदर्शनास आलेली नाही.