भयंकर! मोबाईलवर कार्टून पाहत होता मुलगा, अचानक झाला स्फोट; तुम्ही करू नका 'ही' चूक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 12:11 PM2024-09-16T12:11:02+5:302024-09-16T12:18:35+5:30
एक मुलगा मोबाईलवर कार्टून पाहत होता. मात्र याच दरम्यान मोबाईलचा स्फोट झाला. या घटनेत एक ९ वर्षांचा मुलगा जखमी झाला.
मोबाईल हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत आता हल्ली प्रत्येकाकडे फोन असतोच. पण बरेचसे लोक फोन चार्जिंगला लावलेला असताना त्यावर गेम खेळतात, व्हिडीओ पाहतात किंवा फोनवर बोलतात. पण असं करणं खूप धोकादायक ठरू शकतं. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
एक मुलगा मोबाईल चार्जिंगला लावून त्यावर कार्टून पाहत होता. मात्र याच दरम्यान मोबाईलचा स्फोट झाला. या घटनेत एक ९ वर्षांचा मुलगा जखमी झाला असून त्याच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी झालेल्या मुलाच्या वडिलांनी सांगितलं की, ही दुर्घटना झाली तेव्हा ते आणि त्यांची पत्नी शेतामध्ये काम करत होती.
वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा मित्रासोबत मोबाईलवर कार्टून पाहत होता. त्याच दरम्यान मोबाईल चार्जिंगला लावलेला असतानाच स्फोट झाला. या घटनेनंतर मुलाच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली. यानंतर मुलाला रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले.
मोबाईलच्या आतमध्ये लिथियम-आयर्न बॅटरी असते, जी ज्वलनशील असते. ती लीक होताच बॅटरीला आग लागते. मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना नेहमी लक्षात ठेवा की त्यावर गेम, व्हिडीओ, चित्रपट, सीरिज पाहू नका. तसेच मोबाईल चार्जिंगला ठेवला असेल तर तो उशी किंवा ब्लँकेटच्या खाली दाबून ठेवू नका.