अलर्ट! मोबाईल युजर्ससाठी महत्त्वाची माहिती; 1 जूनपासून बदलणार 'हे' नियम, 'या' सर्व्हिस होणार बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 05:11 PM2022-05-30T17:11:58+5:302022-05-30T17:13:36+5:30

टेक्नॉलॉजीच्या जगात अनेक नवनवीन बदल हे सातत्याने होत असतात. असेच काही खास आणि मोठे बदल हे 1 जून 2022 पासून पाहायला मिळणार आहेत.

mobile phone users alert these rules will change from 1 june 2022 | अलर्ट! मोबाईल युजर्ससाठी महत्त्वाची माहिती; 1 जूनपासून बदलणार 'हे' नियम, 'या' सर्व्हिस होणार बंद 

अलर्ट! मोबाईल युजर्ससाठी महत्त्वाची माहिती; 1 जूनपासून बदलणार 'हे' नियम, 'या' सर्व्हिस होणार बंद 

googlenewsNext

नवी दिल्ली - टेक्नॉलॉजीच्या जगात अनेक नवनवीन बदल हे सातत्याने होत असतात. असेच काही खास आणि मोठे बदल हे 1 जून 2022 पासून पाहायला मिळणार आहेत. Google सह काही सर्व्हिस कायमच्या बंद होणार आहेत. लोकप्रिय असलेले Internet Explorer ब्राउजर देखील जून महिन्यात कायमचे बंद होणार आहे. याशिवाय Amazon आणि Apple देखील त्यांच्या काही सेवा बंद करणार आहेत. एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात देखील बदल होणार आहेत. याबाबत अधिक जाणून घेऊया...

​Internet Explorer होणार बंद 

Internet Explorer या ब्राऊजरची लोकप्रियता कमी झाल्यानंतर आता कंपनीने Internet Explorer ला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 जूननंतर इंटरनेट एक्स्प्लोररला कायमचे बंद केले जाईल. जे लोक अद्याप Internet Explorer वर निर्भर होते, त्यांना मात्र समस्येचा सामना करावा लागेल.

​Amazon वरून खरेदी करता येणार नाही ई-बुक्स 

Amazon वरून पुस्तकांची देखील मोठी विक्री केली जाते. पण आता 1 जूनपासून या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून ग्राहकांना ई-बुक्स खरेदी करता येणार नाही. नवीन गुगल  स्टोर पॉलिसीमुळे हे करण्यात आले आहे. 

​अ‍ॅपल बंद करणार कार्डचा वापर

1 जूनपासून भारतात Apple आयडीचा वापर करून सबस्क्रिप्शन आणि अ‍ॅप खरेदी करण्यासाठी कार्डचा वापर करता येणार नाही. म्हणजेच, भारतीय ग्राहक क्रेडिट व डेबिट कार्डचा उपयोग करून अ‍ॅप स्टोरवरून अ‍ॅप खरेदी करू शकणार नाही. 

​मोबाईलच्या मदतीने काढता येतील एटीएममधून पैसे

एटीएममधून नागरिकांना आता कार्डशिवाय पैसे काढता येणार आहेत. 1 जून २०२२ पासून मोबाईलच्या मदतीने एटीएममधून रोख रक्कम काढता येईल. या प्रक्रियेमध्ये युजर्स विना डेबिट आणि क्रेडिट कार्डचे एटीएममधून पैसे काढू शकतात. यामुळे कार्डद्वारे होणारी फसवणूक रोखण्यास मदत होईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: mobile phone users alert these rules will change from 1 june 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.