Mobile Security: मोबाईल युझर्ससाठी चिंतेची बातमी, जर हे गाणं ऐकलं तर याल अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 04:14 PM2022-04-27T16:14:52+5:302022-04-27T16:15:18+5:30
Mobile Security: अँड्रॉईड स्मार्टफोन युझर्ससाठी आज आलेली ही बातमी चिंता वाढवणारू ठरू शकते. काही रिपोर्ट्सनुसार अँड्रॉईड स्मार्टफोन्समध्ये युझर्सना खूप अडचणींचा सामना करावा लागू शकतो. फोनच्या ऑडिओ फॉरमॅटच्या सिक्युरिटीमध्ये काही समस्या निर्माण झाल्या आहेत.
नवी दिल्ली - अँड्रॉईड स्मार्टफोन युझर्ससाठी आज आलेली ही बातमी चिंता वाढवणारू ठरू शकते. काही रिपोर्ट्सनुसार अँड्रॉईड स्मार्टफोन्समध्ये युझर्सना खूप अडचणींचा सामना करावा लागू शकतो. फोनच्या ऑडिओ फॉरमॅटच्या सिक्युरिटीमध्ये काही समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सुमारे ६७ टक्के अँड्रॉईड स्मार्टफोन्स सिक्योरिटी अॅटॅकच्या जाळ्यात सापडू शकतात. याबाबती माहिती चेक पॉईंट रिसर्चच्या रिसर्चर्सनी दिली आहे.
हा रिपोर्ट वर्षभरासाठीचा आहे. रिसर्चर्सनी सांगितले की, गेल्यावर्षीही याच अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यासाठी एक पॅच जारी करण्यात आला होता. मात्र त्याचा अर्थ धोका टळला आहे, असा होत नाही. अजूनही लाखो स्मार्टफोन्स याच्या सावटाखाली आहे.
रिपोर्टमध्ये अँड्रॉईड फोनच्या त्रुटींचा कुणीही सहजपणे फायदा उठवू शकतो, असेही म्हटले आहे. त्याच्या माध्यमातून कुठलाही स्कॅमर तुमच्या फोनमध्ये गाणं पाठवू शकतो. जर हे गाणे युझरने ऐकले तर हॅकर युझरच्या डिव्हाईसमध्ये मालशिस कोड इंजेक्ट करू शकतो. जर असे झाले तर युझरच्या डिव्हाईसचा अॅक्सेस हॅकरकडे जातो.
चेक पॉईंट रिसर्चच्या रिसर्चर्सनी या त्रुटीचा शोध लावला आहे. त्याची माहिती घेण्यासाठी त्यांनी अॅपल लॉसलेस ऑडिओ कोडेकचा वापर केला आहे. चेक पॉईंट रिसर्चच्या रिसर्चर्सनुसार, जेव्हा एएलएसी फाइलमध्ये त्रुटींचा वापर करण्यात आला, त्यात दिसून आले की, डिव्हाईसवर रिमोट कोड एक्झिक्युशून अॅटॅक होऊ शकतो. असे केल्याने हॅकर, युझरच्या फोनच्या कॅमेऱ्यापर्यंत अॅक्सेस करू शकतो. तसेच डिव्हाईसला मालवेअरने संक्रमित करू शकतो.