Jio, Airtel, Vi ला मोठा धक्का; महागड्या रिचार्जमुळे 1 कोटी ग्राहकांनी सोडली साथ...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 06:46 PM2024-11-22T18:46:34+5:302024-11-22T18:47:01+5:30
Mobile Subscriber Base: गेल्या काही महिन्यांत BSNL च्या ग्राहकांची संख्या वाढऊन 9.18 कोटींवर पोहोचली आहे.
Mobile Tariff Hike: देशातील तीन प्रमुख दूरसंचार कंपन्यांनी जून 2024 मध्ये आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्या होत्या. यामहागड्या दरांमुळे कंपन्यांच्या ग्राहकांच्या संख्येत सलग तिसऱ्या महिन्यात मोठी घट झाली आहे. सर्वात मोठा फटका मुकेश अंबानींच्या रिलायन्स समूहाची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओला बसला आहे. टेलिकॉम सेक्टर रेग्युलेटर ट्रायच्या मते, रिलायन्स जिओने सप्टेंबर 2024 मध्ये 7.9 मिलियन किंवा 79 लाख ग्राहक गमावले आहेत.
जिओच्या ग्राहक संख्येत मोठी घट
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने सप्टेंबर 2024 साठी देशातील दूरसंचार ग्राहकांचा डेटा जारी केला आहे. या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात रिलायन्स जिओच्या मोबाईल ग्राहकांच्या संख्येत 7.9 मिलियन, म्हणजेच 79 लाखांची घट झाली आहे. ऑगस्ट महिन्यात रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या 47.17 कोटी होती, जी सप्टेंबर महिन्यात 46.37 कोटींवर आली आहे.
व्होडाफोन आयडिया - भारती एअरटेललाही धक्का
तिसरी सर्वात मोठी मोबाइल कंपनी व्होडाफोन आयडिया ग्राहक गमावण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. कंपनीच्या ग्राहकांच्या संख्येत 15 लाखांनी घट झाली आहे. वोडाफोन आयडियाचे ऑगस्टमध्ये एकूण 21.40 कोटी ग्राहक होते, जे सप्टेंबर महिन्यात 21.24 कोटींवर आले आहेत. याशिवाय, भारती एअरटेलच्या ग्राहकांची संख्याही 14 लाखांनी कमी होऊन 38.34 कोटींवर आली आहे.
BSNL चा फायदा
एकीकडे खासगी कंपन्या ग्राहक गमावत आहेत, तर दुसरीकडे सरकारी सरकारी दूरसंचार कंपनी BSNL च्या ग्राहकांच्या संख्येत सप्टेंबर महिन्यात वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या 8.49 लाखांनी वाढून, 9.18 कोटींवर पोहोचली आहे.