एकवेळ तुम्ही हरवाल, पण मोबाईल हरवणार नाही...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 08:55 AM2018-09-17T08:55:51+5:302018-09-17T08:56:52+5:30
पर्यटन स्थळी, गर्दीच्या ठिकाणी मोबाईल हरवण्याची जास्त शक्यता असते. हा प्रसंग टाळण्यासाठी काही प्रमाणात काळजी घेतल्यास समस्या येणार नाही.
आज मोबाईलमध्ये महत्वाचे इमेल, फोन नंबर, बँकांची माहिती, सोशल मिडीयास पासवर्ड यासारखी संवेदनशील माहिती स्टोअर केलेली असते. यामुळे मोबाईल हरवल्यास काय अवस्था होते, हे सांगायला नकोच. पर्यटन स्थळी, गर्दीच्या ठिकाणी मोबाईल हरवण्याची जास्त शक्यता असते. हा प्रसंग टाळण्यासाठी काही प्रमाणात काळजी घेतल्यास समस्या येणार नाही.
मोबाईल चोरी झाल्यानंतर तो ट्रॅक करण्य़ासाठी काही अॅप्स आहेत. नवा मोबाईल घेतल्यानंतर फाईंड माय डिव्हाईस हे गुगलचे अॅप डाऊनलोड करून रजिस्टर करावे. म्हणजे एखाद्यावेळी मोबाईल सापडत नसल्यास या अॅपद्वारे ट्रॅक करता येईल. हा झाला मोबाईल हरवल्यानंतरचा उपाय. परंतू काही प्रमाणात काळजी घेतल्यास मोबाईल हरविण्याची शक्यता कमी होईल.
मोबाईल फोन गर्दीच्या ठिकाणी जास्त हरवतात. अशावेळी मोबाईल हातात ठेवावा. जर फोन बॅगमध्ये ठेवत असल, तर तो थोडा आतमध्ये परंतू खालच्या बाजुला ठेवू नये. कारण बॅगेला खालून कापूनही फोन लंपास केले जातात.
फोनवर कमी आवाजामध्ये गाणी ऐकायची असल्यास हेडफोन लावून फोन खिशात ठेवू शकता. कारण आवाज ऐकत असल्याने चोर असे फोन काढण्याची शक्यता कमीच असते.
आपल्या फोनचा आयएमइआय नंबर कुठेतरी लिहून ठेवावा. हा नंबर डायल पॅडवर *#06# लिहिल्यानंतर मिळतो. किंवा मोबाईलच्या बॉक्सवर नमूद असतो. यामुळे चोरी झालेल्या फोनचे लोकेशन समजू सकते.
बऱ्याचदा असे होते की, चोरीला गेलेला फोन वाय फाय सर्व्हिस किंवा इंटरनेटल जोडलेला नसेल. पंरतू तुम्हाला तुमची माहिती सुरक्षित ठेवायची आहे. अशावेळी अॅपद्वारे फोनवर नियंत्रण मिळवता येते. तुमची माहिती डिलीट करून फोन मिळाल्यानंतर ती पुन्हा मिळवता येते.
दुसऱ्या फोनला आपल्या गुगुल अकाऊंटशी जोडणेही फायद्याचे ठरते. म्हणजेच स्मार्टवॉच, टॅबलेट सारखे गॅजेट हरवले असेल तर ते गुगलशी जोडलेले असल्यास परत मिळवता येते. परंतू यासाठी जेव्हा नवीन फोन घ्याल तेव्हापासूनच गुगलचे फाईंड माय डिव्हाईस हे अॅप डाऊनलोड केल्यास वेळ निघून जात नाही.