ChatGPT साठी मोजावे लागणारे दर महिन्याला पैसे; किंमत ऐकून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 07:43 PM2023-01-21T19:43:39+5:302023-01-21T19:44:05+5:30

जर तुम्ही ChatGPT चं फ्री प्लॅन वापरलं तर त्यात तुम्हाला चॅटबॉटची सर्व्हिस तेव्हाच मिळेल जेव्हा डिमांड कमी असेल.

Monthly fees for ChatGPT; Know About Open AI Subscription | ChatGPT साठी मोजावे लागणारे दर महिन्याला पैसे; किंमत ऐकून व्हाल हैराण

ChatGPT साठी मोजावे लागणारे दर महिन्याला पैसे; किंमत ऐकून व्हाल हैराण

googlenewsNext

नवी दिल्ली  - ChatGPT गेल्या काही दिवसांपासून चर्चेचे केंद्र बनले होते. काहीजण याला गुगलच्या शेवटाची सुरुवात म्हणत होते, तर काहीजण त्यात सर्च इंजिनचे भविष्य शोधत होते. कंपनी हे App सशुल्क आणण्याचा विचार करत असल्याची चर्चा सुरू होती. शेवटी Open AI नं त्याचे तपशील जारी केले आहेत. याचा अर्थ CharGPT साठी तुम्हाला सब्सक्रिप्शन प्लॅन खरेदी करावं लागेल. 

या App चं फ्री व्हर्जनही असेल. याला तुम्ही Youtube सब्सक्रिप्शनसारखं पाहू शकता. जे तुम्हाला एक फ्री व्हर्जन आणि एक प्रिमियम व्हर्जन म्हणू शकता. ChatGPT असेच आहे. Open AI चं प्रोफेशनल प्लॅन लॉन्च करणार आहे. त्यासाठी युजर्सला दर महिन्याला ४२ डॉलर खर्च करावे लागतील. भारतात या कंपनीने वेगळ्या प्लॅनची घोषणा केली नाही. म्हणजे भारतात ४२ डॉलर म्हणजे ३४०० रुपये दर महिना खर्च करू शकतात. प्रोफेशनल युजर्सला अनेक फिचर्स उपलब्ध होतील जे फ्री यूजर्सला असणार नाहीत. 

जर तुम्ही ChatGPT चं फ्री प्लॅन वापरलं तर त्यात तुम्हाला चॅटबॉटची सर्व्हिस तेव्हाच मिळेल जेव्हा डिमांड कमी असेल. म्हणजे कंपनी प्रोफेशनल युजर्सला आधी प्राधान्य देईल. त्याशिवाय यूजर्सला यावर स्टँडर्ड स्पीड आणि मॉडल अपडेट्स पाहायला मिळतील. तर प्रोफेशनल प्लॅनचे अनेक फायदे होणार आहेत. त्याठिकाणी युजर्सला हाय डिमांड सर्व्हिस मिळेल. इतकेच नाही तर युजर्सला हायस्पीड रिस्पॉन्स मिळेल आणि नव्या फिचर्सला प्राधान्याने यूज करण्याची संधी मिळेल. 

सध्या ChatGPT आणि Microsoft एकत्र आलेत. ज्यामुळे ते सर्च इंजिन सेगमेंटमध्ये गुगलला टक्कर देऊ शकतील. या चॅटबॉटमध्ये Open AI डेव्हलप केले आहे. जर तुम्ही ChatGPT यूज केले असेल तर त्याची व्हॅल्यू तुम्हाला समजू शकते. या चॅटबॉटला न्यूयॉर्क शहरात शाळांमध्ये बंदी घातली आहे. याचं कारण म्हणजे या App चा गैरवापर होऊ शकतो. मुलं याच्या मदतीने होमवर्क तयार करत आहेत. याच्या लेखणी ह्यूमन टच असतो. कारण ते एका मनुष्याप्रमाणे भाषेचा वापर करतो. 
 

Web Title: Monthly fees for ChatGPT; Know About Open AI Subscription

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.