बापरे! तब्बल 300 कोटी पासवर्डचा डेटा लीक; लगेचच असं चेक करा आपलं अकाऊंट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 07:09 PM2021-02-22T19:09:33+5:302021-02-22T19:14:08+5:30

300 Crore Password Leak : इंटरनेट युजर्संच्या अकाउंट्समध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे लीक समोर आल्याचा दावा केला जात आहे.

more than 15 billion data leaks gmail netflix and linkedin profile at stake | बापरे! तब्बल 300 कोटी पासवर्डचा डेटा लीक; लगेचच असं चेक करा आपलं अकाऊंट

बापरे! तब्बल 300 कोटी पासवर्डचा डेटा लीक; लगेचच असं चेक करा आपलं अकाऊंट

googlenewsNext

नवी दिल्ली - जगभरात हल्ली डेटा लीक ही एक सर्वात मोठी समस्या बनली आहे. याच दरम्यान आता इंटरनेट युजर्संच्या अकाउंट्समध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे लीक समोर आल्याचा दावा केला जात आहे. जगभरातील जवळपास 300 कोटी आयडी पासवर्ड लीक झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये Gmail शिवाय Netflix आणि Linkedin प्रोफाईलचा देखील समावेश आहे. The Sun च्या एका रिपोर्टनुसार, यावेळी जगातील सर्वात मोठे लीक झाले आहे. जवळपास 300 कोटी लोकांचे पासवर्डचा डेटा लीक झाला आहे. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा सिक्योरिटी लीक मानला जात आहे.

Gmail, Netflix आणि Linkedin प्रोफाईलही लीक

Gmail, Netflix आणि Linkedin च्या लॉगिन आयडी आणि पासवर्ड सुद्धा लीक झाले आहेत. रिपोर्टच्या माहितीनुसार, पहिल्यांदा डेटा लीकमध्ये लोकांचा Netflix आणि Linkedin च्या प्रोफाईलचा यात समावेश आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, जवळपास 1500 कोटी अकऊंटमध्ये ब्रीच झाले आहे. तर जवळपास 300 कोटी लोकांचे ईमेल आयडी आणि पासवर्ड हॅक करण्यात आले आहेत. तसेच यावेळी जवळपास 11.7 कोटी लोकांचे Linkedin आणि Netflix अकाऊंट्स हॅक झाले आहेत. 

असं चेक करा आपलं अकाऊंट

मिळालेल्या माहितीनुसार, युजर्सचा डेटाला इंटरनेटवर अपलोड करण्यात आला आहे. हॅकर्स या डेटाचा वापर दुसऱ्या अकाऊंटला हॅक करण्यासाठी करू शकतात. जर तुम्हाला तुमचे अकाऊंट लीक झाल्याचा संशय येत असेल तर याला चेक करता येऊ शकतं. तुम्ही https://cybernews.com/personal-data-leak-check/ वर क्लिक करा. या साईटवर तुम्ही तुमचे ईमेल आयडी टाकून लीकची माहिती चेक करू शकता. यासाठी ही साईट ओपन करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

...नाहीतर तुमचं WhatsApp अकाऊंट होईल हॅक, "या" सेटिंग्ज लगेचच बदला अन् वेळीच घ्या खबरदारी

सायबर सिक्योरिटी एक्सपर्ट जॅक डॉफमॅनने सर्व व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला अलर्ट केलं आहे. व्हॉट्सअ‍ॅप युजर्सनी त्वरित आपल्या सेटिंग्जमध्ये बदल करावेत अन्यथा त्यांचं व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट हॅक होऊ शकतं असं सांगण्यात आलं आहे. हॅकर्सनी व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटचा अ‍ॅक्सेस मिळवण्यासाठी नवा मार्ग शोधला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ज्यात मालवेअरद्वारे हॅकर्स दूरुनच युजर्सच्या फोनमध्ये येणारा सहा अंकी व्हेरिफिकेशन कोड मिळवू शकतात. त्यानंतर हॅकर्स त्यांच्या डिव्हाईसवर युजर्सचं व्हॉट्सअ‍ॅप रन करू शकतात. स्कॅमचा, फसवणूकीचा खुलासा गेल्या वर्षी यूकेतील एका मीडिया हाऊसनेही केला होता. त्यानंतरही अशाप्रकारचे हॅकिंगचे प्रकार वाढले आहेत. अशा प्रकारचे हॅकिंग प्रकार रोखण्यासाठी फोनमध्ये एका सेटिंगद्वारे बदल केले जाऊ शकतात.

व्हॉट्सअ‍ॅप युजर्स हॅकिंगपासून वाचण्यासाठी एक सेटिंग करू शकतात. ही सेटिंग टू-स्टेप व्हेरिफिकेशन आहे. यामध्ये एक सहा डिजिटचा कोड सेट करावा लागतो. या कोडमुळे दुसऱ्या डिव्हाईसवर लॉगइन करताना या कोडनेही करता येऊ शकतं. व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना आकर्षित करण्यासाठी आता नवनवीन भन्नाट फीचर्स आणत आहे. असंच एक हटके फीचर पुन्हा एकदा आणलं असून याचा मोठा फायदा हा आता युजर्सना होणार आहे. फेसबुकप्रमाणे आता व्हॉट्सअ‍ॅपवरही लॉग आऊट करता येणार आहे. सोशल मीडिया साईट फेसबुक आदीमध्ये आपण ऑनलाईन येण्यासाठी लॉगिन करतो आणि ऑफलाईन जाण्यासाठी लॉग आऊट करतो. त्याचप्रमाणे आता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये देखील अशी सुविधा लवकरच येणार आहे.

 

Web Title: more than 15 billion data leaks gmail netflix and linkedin profile at stake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.