गुगल आणि अॅपलकडून 8 लाखांहून अधिक अॅप्सवर बंदी, 'या' अॅप्सचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 03:50 PM2021-09-22T15:50:18+5:302021-09-22T15:53:50+5:30

डिलिस्ट करण्यापूर्वी या अॅप्सला 9 अब्ज वेळा डाउनलोड करण्यात आलं होतं.

More than 8 lakh apps banned from Google and Apple | गुगल आणि अॅपलकडून 8 लाखांहून अधिक अॅप्सवर बंदी, 'या' अॅप्सचा समावेश

गुगल आणि अॅपलकडून 8 लाखांहून अधिक अॅप्सवर बंदी, 'या' अॅप्सचा समावेश

googlenewsNext

गुगल आणि अॅपलने त्यांच्या स्टोअरमधून लाखो अॅप्सवर बंदी घातली आहे. Pixalate च्या 'H1 2021 डिलिस्टेड मोबाईल अॅप्स रिपोर्ट'नुसार, 2021 च्या पहिल्या सहामाहीत 8,13,000 हून अधिक अॅप्स Google Play Store आणि Apple App Store वरून काढून टाकण्यात आले आहेत. 

पिक्सलेट ऑफ कॅलिफोर्नियाच्या मते, डिलिस्ट करण्यापूर्वी 8 लाखांहून अधिक अॅप्स गुगल प्ले स्टोअरवरून 9 अब्ज वेळा डाउनलोड केले गेले होते. तसेच, या अॅप्सला अॅपलच्या अॅप स्टोअरमधून काढण्यापूर्वी 2.1 कोटी रेटींग्स होत्या. म्हणूनच, अॅप स्टोअरमधून काढून टाकले असले तरी, लाखो युझरच्या स्मार्टफोनवर हे अॅप्स आताही असू शकतात. 

एका रिपोर्टनुसार, गुगल प्ले स्टोअरवरील 86 टक्के मोबाईल अॅप्स आणि अॅपल अॅप स्टोअरवरील 89 टक्के मोबाईल अॅप्सने 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना टार्गेट केलं आहे. याशिवाय, 25 टक्के प्ले स्टोअर अॅप्स आणि 59 टक्के अॅप स्टोअर अॅप्समध्ये कोणतीही प्रायव्हसी पॉळिसी धोरण नव्हते. तसेच, 26 टक्के अॅप्स रशियन गूगल प्ले स्टोरवरुन हटवण्यात आले असून, 60 टक्के अॅप्स चीनच्या अॅप स्टोरवर लिस्टेड होते. चीनी अॅप स्टोरवर कोणत्याच प्रकारची प्रायव्हसी पॉलिसी नव्हती.

का हटवले अॅप्स ?
काढून टाकलेल्या गूगल अॅप्सपैकी 66 टक्के अॅप्समध्ये किमान एक धोकादायक परमिशन अनिवार्य होती. या धोकादायक परवानगीला रनटाइम परवानगी असेही म्हणतात. यामुळे, या अॅप्सला मोबाईलमधला डेटा मिळवणं सोपं होतं.

Web Title: More than 8 lakh apps banned from Google and Apple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.