WhatsApp वर चुकूनही 'ही' चूक करू नका! कंपनीनं एका महिन्यात १० लाख अकाऊंट्स केले बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 06:12 PM2022-04-02T18:12:34+5:302022-04-02T18:12:49+5:30

व्हॉट्सअ‍ॅप दर महिन्याला लाखो अकाऊंट्सवर बंदी घालत आहे. फेब्रुवारी महिन्यातही व्हॉट्सअ‍ॅपनं लाखो अकाऊंट्स बंद केली आहेत. IT नियम 2021 नुसार, META च्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मनं फेब्रुवारी 2022 चा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

more than 10 lakh indian whatsapp accounts were banned in february | WhatsApp वर चुकूनही 'ही' चूक करू नका! कंपनीनं एका महिन्यात १० लाख अकाऊंट्स केले बंद

WhatsApp वर चुकूनही 'ही' चूक करू नका! कंपनीनं एका महिन्यात १० लाख अकाऊंट्स केले बंद

Next

व्हॉट्सअ‍ॅप दर महिन्याला लाखो अकाऊंट्सवर बंदी घालत आहे. फेब्रुवारी महिन्यातही व्हॉट्सअ‍ॅपनं लाखो अकाऊंट्स बंद केली आहेत. IT नियम 2021 नुसार, META च्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मनं फेब्रुवारी 2022 चा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान 10 लाखांहून अधिक व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट्स बंद करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. या अकाऊंट्सवर प्लॅटफॉर्मवर हानिकारक कृत्य करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये खोट्या बातम्या पसरवणं किंवा इतरांना त्रास देणं यांचा समावेश आहे.

WhatsApp च्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान, डेटा सायन्टिस्ट आणि तज्ञांमध्ये कंपनी सातत्यानं गुंतवणूक करत आहे. ते व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी पावलं उचलत आहेत. भारतातील IT नियम 2021 चे पालन करून त्यांनी ९व्या महिन्याचा अहवाल (फेब्रुवारी 2022) सादर केला आहे. यूजर-सेफ्टी रिपोर्टमध्ये यूजर्सच्या तक्रारी आणि त्यावर व्हॉट्सअ‍ॅपने केलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली आहे.

नवीन अहवालानुसार, WhatsApp ने फेब्रुवारी महिन्यात 1.4 दशलक्ष अकाऊंट्स बंद केली आहेत. कंपनीनं पुन्हा सांगितलं आहे की या प्लॅटफॉर्मवरील सर्व संदेश एंड-टू-एंड एनक्रिप्टेड आहेत. याचा अर्थ मेसेज पाठवणारा आणि रिसिव्हर यांच्याशिवाय इतर कोणताही तृतीय पक्ष मेसेज वाचू शकत नाही. कंपनीने स्पष्ट केलं आहे की व्हॉट्सअ‍ॅप, मेटा (फेसबुक) ची मूळ कंपनी देखील तो संदेश वाचू शकत नाही. अकऊंट्स ब्लॉक करण्यासाठी WhatsApp बिल्ट-इन एब्यूज डिटेक्शन टेक्नोलॉजीचाही वापर केला जातो. 

Web Title: more than 10 lakh indian whatsapp accounts were banned in february

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.