Mosquito Fan: आता डासांची खैर नाही; 'या' उपकरणामुळे मिळणार डासांपासून कायमची सुटका...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 05:50 PM2022-09-29T17:50:23+5:302022-09-29T17:51:07+5:30

Mosquito Trap: डासांपासून बचाव करण्यासाठी लोक मॉस्किटो रिपेलंटचा वापर करतात, पण ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. हे उपकरण एकदा वापरुन बघा...

Mosquito Fan: No more mosquitoes; This device will get rid of mosquitoes permanently | Mosquito Fan: आता डासांची खैर नाही; 'या' उपकरणामुळे मिळणार डासांपासून कायमची सुटका...

Mosquito Fan: आता डासांची खैर नाही; 'या' उपकरणामुळे मिळणार डासांपासून कायमची सुटका...

googlenewsNext

Mosquito Killer: येत्या काही आठवड्यांत हिवाळा सुरू होणार आहे. थंडी वाढल्यानंतर डासांचा प्रादुर्भावही वाढू लागतो. डास विशेषतः लहान मुले, म्हातारे आणि झोपेत असलेल्या व्यक्तींवर हल्ला करतात. डासांमुळे अनेक रोगही पसरतात. डासांपासून बचाव करण्यासाठी लोक मॉस्किटो रिपेलंटचा वापर करतात, पण ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी एक असे इको फ्रेंडली उपकरण आणले आहे, जे डासांपासून बचाव करण्यासोबतच पर्यावरणपूरक आहे.

कोणते उपकरण आहे?
आम्ही ज्या उपकरणाबद्दल बोलत आहोत, ते एक डास मारणारा फॅन आहे. ₹ 499 किंमत असलेल्या या फॅनला The Cube Mart Electric Indoor Mosquito Trap Power Insect Mosquito Killer असे नाव देण्यात आले आहे. हा एक प्रकारचा बॅटरीवर चालणारा सक्शन फॅन आहे, जो डासांना आकर्षित करतो आणि त्यांचा खात्मा करतो. या खास फॅनमध्ये एक चेंबर आहे, ज्यात डास अडकून मरण पावतात. 

फॅन कसा काम करतो?
या डिव्हाइसमध्ये तीन सेक्शन आहेत. पहिल्या सेक्षनमध्ये अँबिएंट लायटिंग आहे, ज्याकडे डास आकर्षित होतात. दुसऱ्या सेक्शनमध्ये एक टनल आहे, ज्यात डास जातात आणि तिसऱ्या सेक्षनमध्ये एक शक्तीशाली पंखा आहे. या पंख्यात आल्यानंतर डास त्याकडे ओढले जातात आणि मरण पावतात. हा फॅन बॅटरीवर चालणारा असून, एकदा चार्ज केल्यानंतर अनेक तास चालू शकतो.

Web Title: Mosquito Fan: No more mosquitoes; This device will get rid of mosquitoes permanently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.