Popular Passwords In India: सहज हॅक होणारे 'हे' पासवर्ड चुकूनही नका वापरू; पाहा यादी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 03:36 PM2021-11-19T15:36:33+5:302021-11-19T15:36:55+5:30
Popular Passwords In India: NordPass ने जगभरातील 50 देशांमध्ये 2021 मध्ये सर्वाधिक वापरल्या गेलेल्या पासवर्डसची यादी प्रसिद्ध केली आहे. हे पासवर्ड क्रॅक करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही असे देखील सांगण्यात आले आहे.
Popular Passwords In India: पासवर्ड मॅनेजमेंट सर्व्हिस नॉर्डपासने एक एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. या रिपोर्टमधून भारतात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या काही पासवर्डचा खुलासा करण्यात आला आहे. तसेच हे पासवर्ड क्रॅक करण्यासाठी किती वेळ लागतो हे देखील रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. त्यानुसार 123456, 123456789, 111111, आणि 12345 सारखे सहज क्रॅक करता येणारे पासवर्ड जगभरात मोठ्या प्रमाणावर वापरले जातात.
50 देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पासवर्डसची माहिती नॉर्डपासने दिली आहे. ज्यात qwerty, pasaword, dragon, आणि money यांचा जास्त वापर केला जातो. रिपोर्टनुसार asdfghjkl, asdfgh, आणि 147258369 सारखे पासवर्ड देखील एक सेकंदात हॅक केले जातात.
भारतात मात्र सर्वाधिक वापरला जाणारा पासवर्ड ‘paasword’ आहे, त्याचबरोबर 12345, 123456, 123456789, 12345678, india123, 1234567890, 1234567, qwerty, abc123, iloveyou, xxx आणि अन्य पासवर्ड पैकी india123 व्यतिरिक्त इतर पासवर्ड मिनिटांत क्रॅक करता येतात. India123 हा पासवर्ड क्रॅक करण्यासाठी हॅकरला 17 मिनिटांचा वेळ लागू शकतो.
जगभरातील लोक मोठ्या प्रमाणावर स्वतःचे नाव पासवर्ड म्हणून वापरतात, अशी माहिती नॉर्डपासच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आली आहे. ‘onedirection' या बँडचे नाव देखील पासवर्ड म्हणून 2021 च्या यादीत समावेश झाला येऊ. त्याचप्रमाणे फुटबॉल क्लब liverpool, कार ब्रँड्स ferrari, porsche देखील यावर्षी सर्वाधिक वापरलेले पासवर्डस आहेत, जे अगदी सहज हॅक केले जातात.