2017मध्ये भारतात हे आहे गुगलवर टॉप ट्रेंडींग आणि मोस्ट सर्च ?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 04:08 PM2017-12-15T16:08:42+5:302017-12-15T17:47:44+5:30
२०१७ या वर्षात भारतात गुगलवर सगळ्यात जास्त काय सर्च केलं गेलं आणि सगळ्यात जास्त काय ट्रेडींग होतं याची यादी गुगलने जाहीर केलं आहे.
नवी दिल्ली : खरंतर २०१७ हे वर्ष खऱ्या अर्थानं क्रांती करणारं वर्ष ठरलंय. यावर्षात सगळ्यात जास्त ट्रेंडिंग काय होतं माहितेय? सामाजिक, राजकीय, आर्थिक, मनोरंजन क्षेत्रात यावर्षात बरेच बदल झाले. या सगळ्यांची माहिती घेण्यासाठी साहजिकच नेटिझन्सनं गुगलची मदत घेतली. गुगलने २०१७ या वर्षात भारतात सर्वाधिक कोणती गोष्ट सर्च झाली याची यादीच जाहीर केलीय. यामध्ये बिटकॉईनपासून ते बाहुबली २ पर्यंत साऱ्या गोष्टींचा समावेश आहे.
गुगलने नुकतीच एक यादी जाहीर केली. यामध्ये या वर्षभरात कोणत्या विषय जास्त ट्रेंडिंग होते? कोणते प्रश्न गुगलला विचारण्यात आले? गुगलनं याची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये सगळ्यात ट्रेंडिंग ठरला आहे तो बाहुबली २ हा चित्रपट. तर, बिटकॉईन कसं खरेदी करावं इथपासून ते स्क्रीन शॉट कसा काढावा हे प्रश्न गुगलला जास्तप्रमाणात विचारले गेल्याचे गुगलने सांगितले आहे. टॉप ट्रेंडिंग क्वेरिजमध्ये बाहुबली २, इंडियन प्रिमिअम लिग, लाईव्ह क्रिकेट स्कोअर, दंगल चित्रपट असे विषय होते. यावरून भारतीय लोक कशाप्रकारे खेळ आणि मनोरंजन क्षेत्राला आपल्या आयुष्यात महत्त्व देतात हे स्पष्ट होतंय. तसंच, अनेक चित्रपटही ट्रेडिंगमध्ये होते.
आधार कार्ड प्रत्येक कागदपत्रांना लिंक करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच, आधार कार्ड पॅन कार्डलाही जोडण्याचंही आवाहन करण्यात आलंय. म्हणूनच नेटिझन्सनेही आधार कार्ड पॅन कार्डला कसं लिंक करावं हे सर्च करण्यात आलंय. तसंच, जिओ फोन कसा बुक करावा, बिटकॉईन भारतात कसं खरेदी करावं, स्क्रीनशॉट कसा काढावा, होळीत चेहऱ्याला लागलेला रंग कसा काढावा असेही प्रश्न गुगलवर विचारण्यात आले आहेत. एव्हढेच नव्हे तर बिग बॉस ११ साठी मतदान कसं करावं असा प्रश्नही गुगलला विचारण्यात आला. जीएसटी म्हणजे काय?, बिटकॉईन काय आहे? जलिकट्टू काय आहे? हे प्रश्नही गुगलवर ट्रेंडिंग होते. तसंच, आपीएल, आयीसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफी, सीबीएसई रिझल्ट, युपी निवडणूक निकाल, जीएसटी या बातम्यांनीही ट्रेंडिंग लिस्टमध्ये मानाचं स्थान पटकावलं आहे.
तंत्रज्ञानविषयक बातम्यांसाठी येथे क्लिक करा.
टॉप ट्रेंडिंग Queries
बाहुबली २
इंडिअन प्रिमिअर लिग
लाईव्ह क्रिकेट स्कोअर
दंगल
हाल्फ गर्लफ्रेंड
बद्रीनाथ की दुल्हनिया
मुन्ना मिशेल
जग्गा जासूस
चॅम्पिअन्स ट्रॉफी
रईस
आणखी वाचा - डीटीएच व केबलवरूनही पाहता येणार नेटफ्लिक्स !
टॉप ट्रेंडिंग 'HOW TO'
आधार कार्ड पॅन कार्डला कसं जोडावं?
जिओ फोन कसा बुक करावा?
बिटकॉईन भारतात कसा विकत घ्यावा?
स्क्रिन शॉट कसे काढावे?
होळीचा रंग चेहऱ्यावर कसा काढावा?
जीएसटी रिर्टन कशी फाईल करावी?
म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करावी?
बीग बॉस ११ मध्ये कसं मतदान करावं?
भारतात इटिरम कसं विकत घ्यावं?
आणखी वाचा - फेसबुक मॅसेंजरची मुसंडी, युजर्संची संख्या झाली 170 कोटी
टॉप ट्रेंडिंग 'WHAT IS'
जीएसटी काय आहे?
बिटकॉईन काय आहे?
जलिकट्टू काय आहे?
बीएस३ गाडी काय आहे ?
पेटा म्हणजे काय?
जिओ प्राईम म्हणजे काय?
कॅसिनी म्हणजे काय?
फिजेट स्पिनर म्हणजे काय?
लुनार ग्रहण म्हणजे काय ?
रॅन्समवेअर म्हणजे काय ?
आणखी वाचा - गुगल असिस्टंटची वाढली व्याप्ती; आता टॅबलेट व जुन्या स्मार्टफोनवरही वापरता येणार