कोणताही गाजावाजा न करता Moto E20 स्मार्टफोन लाँच; कमी किंमतीत शानदार Motorola फोन सादर  

By सिद्धेश जाधव | Published: September 15, 2021 12:56 PM2021-09-15T12:56:56+5:302021-09-15T12:57:53+5:30

Moto E20 Price In India: Motorola ने जागतिक बाजारात Moto E20 नावाचा बजेट फोन सादर केला आहे. हा कंपनीचा पहिला फोन आहे जो Unisoc T606 चिपसेटसह बाजारात आला आहे.

Moto e20 launched with 6 5 inch max vision display and android 11 go in latin america  | कोणताही गाजावाजा न करता Moto E20 स्मार्टफोन लाँच; कमी किंमतीत शानदार Motorola फोन सादर  

कोणताही गाजावाजा न करता Moto E20 स्मार्टफोन लाँच; कमी किंमतीत शानदार Motorola फोन सादर  

Next

Motorola ने बजेट सेगमेंटमध्ये आपला नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. हा फोन जागतिक बाजारात  Moto E20 नावाने सादर करण्यात आला आहे. साध्य हा स्मार्टफोन कंपनीने Latin America, Europe आणि Middle East बाजारपेठेत उतरविला आहे. तिथे या फोनची किंमत BRL 999 (अंदाजे 14,100 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा फोन भारतात कधी दाखल होईल याची माहिती मात्र कंपनीने दिलेली नाही.  

Moto E20 चे स्पेसिफिकेशन्स 

Moto E20 हा कंपनीचा पहिला फोन आहे जो Unisoc T606 चिपसेटसह बाजारात आला आहे. हा एक अँड्रॉइड 11 (गो एडिशन) वर चालतो. फोनमध्ये 2GB RAM आणि 32GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Moto E20 मध्ये 6.5-इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 720 x 1,600 पिक्सल आणि अस्पेक्ट रेश्यो 20:9 आहे. हा ड्युअल सिम फोन 4जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक अश्या कनेक्टिव्हिटी ऑप्शन्ससह सादर करण्यात आला आहे.  

Moto E20 मध्ये 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो, जो सेल्फी आणि व्हिडीओ कॉल करण्यास मदत करतो. या मोटोरोला फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल. या सेटअपमध्ये 13-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सिक्योरिटीसाठी कंपनीने या फोनच्या बॅक पॅनलवरील लोगोमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर एम्बेड केला आहे. Moto E20 मध्ये पावर बॅकअपसाठी 4,000mAh ची बॅटरी 10W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सादर करण्यात आली आहे.  

Web Title: Moto e20 launched with 6 5 inch max vision display and android 11 go in latin america 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.