शाओमीच्या नाकावर टिचून Motorola करणार शक्तिशाली स्मार्टफोन सादर; Moto Edge X30 चे फोटो आले समोर 

By सिद्धेश जाधव | Published: December 4, 2021 05:59 PM2021-12-04T17:59:40+5:302021-12-04T18:00:35+5:30

Motorola Moto Edge X30 Launch: Motorola Moto Edge X30 स्मार्टफोन Snapdragon 8 Gen1 चिपसेट असलेला जगातील पहिला स्मार्टफोन असेल. हा फोन 5000mAh बॅटरी, 60MP सेल्फी कॅमेरा आणि 50MP रियर कॅमेऱ्यासह बाजारात येईल.

Moto Edge X30 smartphone real life photos surfaced ahead of 9 decmber launch  | शाओमीच्या नाकावर टिचून Motorola करणार शक्तिशाली स्मार्टफोन सादर; Moto Edge X30 चे फोटो आले समोर 

शाओमीच्या नाकावर टिचून Motorola करणार शक्तिशाली स्मार्टफोन सादर; Moto Edge X30 चे फोटो आले समोर 

Next

Motorola नं आपला Moto Edge X30 हा फ्लॅगशिप स्मार्टफोन 9 डिसेंबरला लाँच करणार असल्याची घोषणा केली आहे. या स्मार्टफोनच्या माध्यमातून कंपनी शाओमीला मात देणार आहे. कारण या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा नवीन Snapdragon 8 Gen1 चिपसेट देण्यात येईल. गेले काही वर्ष क्वॉलकॉमचा नवा फ्लॅगशिप प्रोसेसर वापरून फोन सादर करण्याचा मान शाओमी मिळवत होती.  

अनेक लिक्स आणि रिपोर्ट्सनंतर आता Moto Edge X30 चे काही लाईव्ह फोटो लीक झाले आहेत. या फोटोजमधून पुढील आठवड्यच्या लाँचपूर्वीच या फोनच्या डिजाईनची माहिती मिळाली आहे. तसेच फोटोमधून Edge X30 स्मार्टफोनच्या रिटेल बॉक्सचा देखील खुलासा झाला आहे.  

Moto Edge X30 चे संभाव्य स्पेसिफिकेशन  

फोटोजनुसार, Moto Edge X30 स्मार्टफोन फ्लॅट डिजाइनसह सादर केला जाईल. या फोनमध्ये एक पंचहोल देण्यात येईल, ज्यात सेल्फी कॅमेरा असेल. तसेच फोनच्या टॉप आणि बॉटम बेझलचा आकार सारखा आहे. यात डावीकडे ‘वन टच’ बटण देण्यात आला आहे. तर उजवीकडे वॉल्यूम आणि पॉवर बटन मिळेल. 

या स्मार्टफोनमध्ये 1 बिलियन कलर, हाय रिफ्रेश रेट, HDR 10+ सपोर्ट असलेला डिस्प्ले मिळेल, असं कंपनीच्या जनरल मॅनेजरनी सांगितलं आहे. Moto Edge X30 मध्ये 6.67 इंचाचा डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेट आणि 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशनसह मिळेल.  

मोटोरोलाचा हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Gen1 चिपसेटसह बाजारात येईल. हा फोन Android 12 सह बाजारात येऊ शकतो. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा दिला जाईल. परंतु या फोनची खासियत यातील 60MP फ्रंट कॅमेरा असेल. Moto Edge X30 मध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 68W फास्ट चार्जिंग मिळू शकते.  

Web Title: Moto Edge X30 smartphone real life photos surfaced ahead of 9 decmber launch 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.