60MP चा सेल्फी कॅमेरा मिळेल पण दिसणार नाही; Motorola चा भन्नाट फोन बघून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित 

By सिद्धेश जाधव | Published: January 21, 2022 07:50 PM2022-01-21T19:50:15+5:302022-01-21T19:50:40+5:30

Motorola Moto Edge X30 Under Display Camera Edition: Motorola Moto Edge X30 स्मार्टफोनचा अंडर स्क्रीन कॅमेरा व्हेरिएंट येणार आहे. ज्यात 60MP चा सेल्फी सेन्सर मिळू शकतो जो डिस्प्लेच्या खाली देण्यात येईल.

Moto edge x30 under display camera edition to be launched soon  | 60MP चा सेल्फी कॅमेरा मिळेल पण दिसणार नाही; Motorola चा भन्नाट फोन बघून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित 

60MP चा सेल्फी कॅमेरा मिळेल पण दिसणार नाही; Motorola चा भन्नाट फोन बघून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित 

Next

Motorola ने गेल्यावर्षी जगातील पहिला क्वालकॉमचा फ्लॅगशिप Snapdragon 8 Gen 1 SoC प्रोसेसर असलेला स्मार्टफोन सादर केला होता. Moto Edge X30 हा जगातील सर्वात वेगवान चिपसेटसह येणारा स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनच्या लाँचच्या वेळी कंपनीनं फोनचा अंडर डिस्प्ले कॅमेरा असलेला व्हेरिएंट टीज केला होता. आता Moto Edge X30 चा हा व्हेरिएंट छुप्या सेल्फी कॅमेऱ्यासह बाजारात येण्यासाठी तयार झाला आहे. कंपनीच्या मोबाईल बिजनेसचे जनरल मॅनेजर चेन जिन यांनी या डिवाइसचा फोटो शेयर करून लाँचची माहिती दिली आहे.  

Moto Edge X30 Under Display Camera Edition

Motorola Moto Edge X30 स्मार्टफोनचा अंडर स्क्रीन कॅमेरा व्हेरिएंट लवकरच येणार आहे. ज्यात 60MP चा सेल्फी सेन्सर मिळू शकतो जो डिस्प्लेच्या खाली देण्यात येईल. या एकमेव बदलाव्यतिरिक्त नव्या व्हेरिएंटमध्ये Moto Edge X30 सारखेच स्पेक्स मिळतील.  

Moto Edge X30 5G चे स्पेसिफिकेशन्स   

Moto Edge X30 स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेट, 576Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 2400×1080 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. हा मोटोरोला फोन Android 12 OS वर आधारित MyUI 3.0 वर चालतो. यात बेसिक कनेक्टिव्हिटीसह सिक्योरिटीसही इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.   

Moto Edge X30 च्या स्पेक्समधील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे या फोनमधील Qualcomm Snapdragon 8 Gen1 चिपसेट आहे. जो जुन्या क्वॉलकॉम प्रोसेसरपेक्षा कितीतरी वेगवान आहे. सोबत कंपनीनं ग्राफिक्ससाठी Adreno GPU दिला आहे. हा फोन 12GB पर्यंतच्या वेगवान LPDDR5 RAM सह बाजारात आला आहे. त्याचबरोबर 256GB पर्यंतची लेटेस्ट UFS 3.1 स्टोरेज मिळते.   

फोटोग्राफीसाठी या शक्तिशाली फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. सोबत 5MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP थर्ड सेन्सर देण्यात आला आहे. Moto Edge X30 मध्ये 60 मेगापिक्सलचा शानदार फ्रंट कॅमेरा मिळतो. पॉवर बॅकअपसाठी Moto Edge X30 मध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 68W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.  

हे देखील वाचा:

संधी सोडू नका! Realme चा तगडा स्मार्टफोन 4 हजारांच्या डिस्काउंटसह उपलब्ध; 64MP कॅमेरा आणि 65W चार्जिंग

WhatsApp ग्रुप अ‍ॅडमिनचं काम सोपं नाही! या 5 चुका घडवू शकतात तुरुंगवास

Web Title: Moto edge x30 under display camera edition to be launched soon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.