रेडमी-रियलमी राहिले मागे; ‘या’ कंपनीनं आणला 10 हजारांच्या आत 50MP कॅमेरा फोन; बॅटरी देखील मोठी
By सिद्धेश जाधव | Published: April 13, 2022 04:21 PM2022-04-13T16:21:38+5:302022-04-13T16:22:10+5:30
Moto G22 स्मार्टफोन 4GB RAM, 5000mAh बॅटरी, 90Hz रिफ्रेश रेट आणि 50MP कॅमेरा, अशा स्पेसिफिकेशन्ससह आला आहे.
मोटोरोला सध्या भारतीय बाजारात जास्त सक्रिय झाल्याचं दिसत आहे. कंपनी फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये नवीन फोन सादर केल्यानंतर बजेट सेगमेंटमध्ये Moto G22 सादर केला आहे. हा फोन 4GB RAM, 5000mAh बॅटरी, 90Hz रिफ्रेश रेट आणि 50MP कॅमेरा, अशा स्पेक्ससह सादर करण्यात आला आहे. आज या डिवाइसचा पहिला सेल आहे. चला जाणून घेऊया या मोबाईलवरील ऑफर्स.
Moto G22 ची किंमत
Moto G22 स्मार्टफोन मोटोरोला इंडियाच्या स्टोर आणि फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत 10,999 रुपये आहे. मोबाईल विकत घेताना ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास 250 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. तसेच ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर 750 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे हा फोन 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
Motorola Moto G22 चे स्पेसिफिकेशन्स
मोटो जी22 स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे. जो जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टम कंपनीनं दिली आहे. प्रोसेसिंगसाठी ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेकच्या हीलियो जी37 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. यात 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते.
Motorola Moto G22 मध्ये फोटोग्राफीसाठी क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि दोन 2 मेगापिक्सलचे सेन्सर देण्यात आले आहेत. फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर मिळतो. बेसिक कनेक्टिव्हिटीसह रियर फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा मिळते. यातील 5,000एमएएच बॅटरी 20वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्टसह पावर बॅकअप देते.