आजपासून फ्लिपकार्टवर Moto G32 सेल सुरू; मिळतोय तगडा डिस्काउंट, जाणून घ्या ऑफर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 04:31 PM2022-08-16T16:31:37+5:302022-08-16T16:32:47+5:30

मोटोरोला कंपनीने मागील आठवड्यात भारतीय बाजारपेठेत आपल्या नवीन सीरिजचा जी३२ स्मार्टफोन लॉंच केला होता.

Moto G32 sale starts today on Flipkart, know offers and discounts | आजपासून फ्लिपकार्टवर Moto G32 सेल सुरू; मिळतोय तगडा डिस्काउंट, जाणून घ्या ऑफर्स

आजपासून फ्लिपकार्टवर Moto G32 सेल सुरू; मिळतोय तगडा डिस्काउंट, जाणून घ्या ऑफर्स

googlenewsNext

नवी दिल्ली : मोटोरोला कंपनीने (Motorola Company) मागील आठवड्यात भारतीय बाजारपेठेत आपल्या नवीन सीरिजचा जी३२ (G32) स्मार्टफोन लॉंच केला होता. कंपनीने आजपासून मोटो जी३२ ग्राहकांसाठी फ्लिपकॉर्टवर (Flipkart) खरेदीसाठी उपलब्ध केला आहे. या मोबाईलच्या खास फिचर्सबद्दल भाष्य करायचे झाले तर, फुल-एचडी रिझोल्यूशनसह या नवीन हँडसेटमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन चिपसेट वापरण्यात आला आहे. फ्लिपकार्टवर सेल सुरू होण्यापूर्वी मोटो G32 स्मार्टफोनची किंमत, फिचर्स आणि फोन सोबत मिळणाऱ्या ऑफर्सची बरीच चर्चा रंगली होती. चला तर मग जाणून घेऊया आकर्षित करणाऱ्या काही तगड्या ऑफर्सबद्दल. 

ऑफर्स 
मोटो जी३२ खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एचडीएफसी (HDFC) बॅंक क्रेडिट कार्डवर १० टक्के त्वरित डिस्काउंट मिळेल. म्हणजेच एका कार्डमागे १,२५० रूपयांची सूट मिळेल. जर ग्राहकाकडे हे कार्ड असेल तर त्यांना हा स्मार्टफोन ११,७०० रूपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. याशिवाय जिओ ऑफर देखील देण्यात आली आहे, ज्याअंतर्गत युजर्सना २,५४९ रूपयांपर्यंत सूट मिळेल.

Moto G32ची वैशिष्ट्ये
सॉफ्टवेअर आणि डिस्प्ले - या फोनमध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले स्क्रीन आहे, जो फुल HD + डिस्प्ले देईल. कॅमेरा - फोनच्या मागील बाजूस एक ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपचे फिचर्स देण्यात आले आहे. ५० मेगापिक्सेल प्रायमरी सेंसर, याशिवाय ८ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि २ मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर मिळणार आहे. विशेष म्हणजे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. 
प्रोसेसर आणि रॅम - फोन व्यवस्थित चालण्यासाठी आणि युजर्संना त्याचा चांगला लाभ घेण्यासाठी ६८० चिपसेट शिवाय ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेजची सुविधा देण्यात आली आहे. तसेच मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज १ टीबीपर्यंत वाढवले जाऊ शकते. 
बॅटरी - ५००० mAh  बॅटरी फोनला ऊर्जा देण्याचे काम करेल, जी बॅटरी 33W टर्बोपॉवर लवकर चार्जिंग होण्यास सपोर्ट करते. 

या बहुचर्चित स्मार्टफोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत १२,९९९ रूपये आहे. ग्राहकांना हा स्मार्टफोन मिनरल ग्रे आणि सॅटिन सिल्व्हर या २ कलरमध्ये खरेदी करता येणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे मंगळवारी दुपारी १२ वाजल्यापासून फ्लिपकार्टवर या फोनची विक्री करण्यास सुरूवात झाली आहे. तसेच या फोनचे वजन १८४ ग्रॅम एवढे आहे.

 

Web Title: Moto G32 sale starts today on Flipkart, know offers and discounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.