Moto G40 Fusion स्मार्टफोनची किंमत वाढली; बघा नवीन किंमत  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 05:04 PM2021-06-02T17:04:55+5:302021-06-02T17:06:32+5:30

Motorola G40 Fusion Price: मोटोरोलाने Moto G40 Fusion स्मार्टफोनच्या दोन्ही वेरिएंट्सची किंमत वाढवली आहे.  

moto g40 fusion smartphone price hiked by rs 500 In india | Moto G40 Fusion स्मार्टफोनची किंमत वाढली; बघा नवीन किंमत  

Moto G40 Fusion स्मार्टफोनचा 4GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरिएंट आधी 13,999 रुपयांमध्ये मिळत होता त्याची किंमत आता 14,499 रुपये झाली आहे.

Next

Motorola ने Moto G40 Fusion आणि Moto G60 स्मार्टफोन लॉन्च मिडरेंजमध्ये लाँच होते. हे दोन्ही केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन्स एप्रिलमध्ये भारतात आले होते. आता Motorola ने Moto G40 Fusion स्मार्टफोनची किंमत 500 रुपयांनी वाढवली आहे. मोटोरोलाने Moto G40 Fusion स्मार्टफोनच्या दोन्ही वेरिएंट्सची किंमत वाढवली आहे.  

Moto G40 Fusion 500 रुपयांनी महागला 

Moto G40 Fusion स्मार्टफोनचा 4GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरिएंट आधी 13,999 रुपयांमध्ये मिळत होता त्याची किंमत आता 14,499 रुपये झाली आहे. तर, 15,999 रुपयांमध्ये मिळणारा 6GB RAM आणि 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट आता 16,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Moto G40 Fusion चे स्पेसिफिकेशन्स 

Moto G40 Fusion मध्ये 6.8-इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1080×2460 पिक्सल आहे आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. डिस्प्लेमध्ये पंच होल कटआउट देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा–कोर Qualcomm Snapdragon 732G प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी Adreno 618 GPU देण्यात आला आहे. मोटोरोलाच्या या फोनमध्ये 6GB पर्यंत RAM, आणि 128GB पर्यंतची स्टोरेज मिळत आहे. हा स्मार्टफोन Andorid 11 वर चालतो. 

या फोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या मुख्य कॅमेरा 64MP चा आहे, त्याचबरोबर 8MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. या फोनच्या फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Moto G40 Fusion स्मार्टफोनमध्ये 6,000mAh ची बॅटरी आहे जी 20W TurboPower फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. मोटोरोलाच्या या स्मार्टफोनमध्ये रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर, 3.5mm ऑडियो जॅक, USB Type–C पोर्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत.

Web Title: moto g40 fusion smartphone price hiked by rs 500 In india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.