बजेट फ्रेंडली 5G स्मार्टफोनसाठी आणखी एक पर्याय; रेडमी-रियलमीला मागे टाकण्यासाठी Motorola तयार
By सिद्धेश जाधव | Published: April 16, 2022 02:59 PM2022-04-16T14:59:30+5:302022-04-16T14:59:52+5:30
Moto G52 स्मार्टफोन भारतात लाँच होणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा फोन याआधी जागतिक बाजारात लाँच झाला आहे.
Moto G52 स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी GB RAM, 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन 680 चिपसेटसह युरोपियन बाजारात लाँच झाला आहे. आता हा डिवाइस लवकरच भारतीय बाजारात पदार्पण करू शकतो, अशी माहिती 91mobiles नं दिली आहे. तसेच रिपोर्टमधून आगामी मोटोरोला डिवाइसची किंमत देखील सांगण्यात आली आहे.
Moto G52 India Launch
रिपोर्टनुसार, Moto G52 स्मार्टफोन भारतात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात लाँच केला जाईल. तसेच या डिवाइसची किंमत 20,000 रुपयांच्या आसपास असेल. किंमत पाहता या फोनला Redmi Note 11 Pro Plus 5G आणि Realme 9 5G कडून चांगलीच टक्कर मिळू शकते. कंपनीनं मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
Moto G52 चे स्पेसिफिकेशन्स
मोटोरोला मोटो जी52 स्मार्टफोन 6.6 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह बाजारात आला आहे. ही पंच-होल ओएलईडी स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. हा डिवाइस अँड्रॉइड 12 ओएसवर आधारित माययूएक्सवर चालतो. प्रोसेसिंगसाठी यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 6 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते. जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते.
मोटोरोला मोटो जी52 स्मार्टफोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. सोबत 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. फ्रंटला 16 मेगापिक्सलच्या सेल्फी शुटर आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह यात आयपी52 रेटिंग मिळते. यातील 5,000एमएएच बॅटरी 30वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.