क्वालकॉमच्या दमदार 5G प्रोसेसरसह Moto G52j स्मार्टफोन लाँच; किफायतशीर किंमतीत घालणार बाजारात धुमाकूळ
By सिद्धेश जाधव | Published: May 19, 2022 03:37 PM2022-05-19T15:37:24+5:302022-05-19T15:39:20+5:30
Moto G52j स्मार्टफोन स्मार्टफोन क्वालकॉमच्या Snapdragon 695 प्रोसेसरसह सादर केला गेला आहे.
Motorola नं आपला नवीन मिड रेंज 5G स्मार्टफोन Moto G52j लाँच केला आहे. हा फोन IP68 डस्टप्रूफ आणि वॉटर-रेजिस्टन्स रेटिंग, 5000mAh बॅटरी, 50 MP ट्रिपल रियर कॅमेरा, शानदार 120Hz डिस्प्ले आणि क्वालकॉमच्या Snapdragon 6-सीरीज 5G प्रोसेसरसह जपानमध्ये आला आहे. पुढे आम्ही Moto G52j 5G स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स, फिचर्स आणि किंमतीची माहिती दिली आहे.
Moto G52j 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स
Moto G52j स्मार्टफोनमध्ये 6.8-इंचाचा फुलएचडी+ LCD डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह मिळतो. Moto G52j स्मार्टफोन स्मार्टफोनक्वालकॉमच्या Snapdragon 695 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. हा फोन कंपनीनं 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर केला आहे. मोटोरोलाचा हा फोन Android 11 OS वर आधारित My UX वर चालतो.
फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. मोटोरोलाच्या या फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सोबत 8-मेगापिक्सलची सुपरवाईड अँगल लेन्स आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 15W टर्बो पावर चार्ज सपोर्टसह मिळते.
Moto G52j 5G ची किंमत
Moto G52j स्मार्टफोन जापानमध्ये 39,800 जापनीज येन (सुमारे 24,000 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. जो इंक ब्लॅक आणि पर्ल व्हाइट कलरमध्ये विकत घेता येईल. या स्मार्टफोनच्या जागतिक लाँचची माहिती मात्र मिळाली नाही.