Motorola नं स्वस्तात सादर केला वॉटरप्रूफ स्मार्टफोन; 5000mAh ची बॅटरी पुरेल दिवसभर  

By सिद्धेश जाधव | Published: May 13, 2022 12:54 PM2022-05-13T12:54:22+5:302022-05-13T12:54:29+5:30

Motorola Moto G82 स्मार्टफोन 6GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट, IP52 रेटिंग आणि 5000mAh च्या बॅटरीसह बाजारात आला आहे.  

Moto G82 Smartphone Launched WIth 6GB RAM Snapdragon 695 Chipset  | Motorola नं स्वस्तात सादर केला वॉटरप्रूफ स्मार्टफोन; 5000mAh ची बॅटरी पुरेल दिवसभर  

Motorola नं स्वस्तात सादर केला वॉटरप्रूफ स्मार्टफोन; 5000mAh ची बॅटरी पुरेल दिवसभर  

Next

Motorola सध्या थांबायचं नाव घेत नाही आहे. कंपनीनं काल भारतात Motorola Edge 30 हा जगातील सर्वात पातळ 5G Smartphone सादर केला आहे. तर आता युरोपियन बाजारात Moto G82 हँडसेटची एंट्री झाली आहे. हा फोन 6GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट, IP52 रेटिंग आणि 5000mAh च्या बॅटरीसह बाजारात आला आहे. याच लाँच इव्हेंटमधून मोटोरोला एज एक्स30 चॅम्पियन एडिशन देखील सादर करण्यात आला आहे.  

Moto G82 चे स्पेसिफिकेशन्स 

Moto G82 स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी स्नॅपड्रॅगन 695 5G चिपसेटची ताकद देण्यात आली आहे. सोबत 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळते, जी मेमरी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते. Motorola चा हा फोन Android 12 OS वर चालेल. 

Moto G82 ट्रिपल रियर कॅमेरा सिस्टमसह येतो, ज्यात 50MP चा प्रायमरी सेन्सर OIS सह देण्यात आला आहे. सोबत 8MP चा अल्ट्रा-वाईड-अँगल कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर देखील आहे. स्मार्टफोनच्या फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि IP52 वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्स रेटिंग मिळते. Moto G82 मध्ये 5000mAh ची बॅटरी आहे, जी 30W वायर्ड फास्ट-चार्जिंगला सपोर्ट करते.  

Moto G82 ची किंमत 

Moto G82 ची किंमत युरोपियन बाजारात 329.99 युरो (सुमारे 26,374 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा फोन वोल्कॅनिक ग्रे आणि व्हाईट लिली कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. मोटोरोलानं सध्या भारतीय बाजारात आक्रमक पवित्रा घेतला आहे, त्यामुळे लवकरच हा फोन भारतात देखील येऊ शकतो.  

Web Title: Moto G82 Smartphone Launched WIth 6GB RAM Snapdragon 695 Chipset 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.