14 दिवसांच्या बॅटरी लाईफसह भन्नाट Moto Watch 100 लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये
By सिद्धेश जाधव | Published: November 17, 2021 05:06 PM2021-11-17T17:06:20+5:302021-11-17T17:06:56+5:30
Budget Smartwatch Moto Watch 100 Price: Moto Watch 100 अमेरिकेत लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टवॉच Heart Rate आणि SpO2 Sensor सह सादर करण्यात आला आहे.
लेनोवोच्या मालकीच्या मोटोरोलाने स्मार्टवॉच पोर्टफोलियोचा विस्तार केला आहे. कंपनीने अमेरिकेत Moto Watch 100 लाँच केला आहे. हा स्मार्टवॉच सिंगल चार्जमध्ये 14 दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतो असा दावा कंपनीने केला आहे. बेसिक स्मार्टवॉच फिचरसह यात हेल्थ फिचर देखील देण्यात आले आहेत. अमेरिकेत या डिवाइसची किंमत 99.99 डॉलर ठेवण्यात आली आहे, जी 7,430 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते.
Moto Watch 100 चे स्पेसिफिकेशन
Moto Watch 100 मध्ये 1.3 इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले ऑल्वेज-ऑन फिचरला सपोर्ट करतो. हा वॉच 42mm च्या वर्तुळाकार अॅल्युमिनियम केससह सादर करण्यात आला आहे. यातील स्टेनलेस स्टीलचा 20mm च्या Quick Release Spring Bar मुळे स्ट्रॅप बदलणे सोप्पे होते.
Moto Watch 100 कंपनीने 5ATM वॉटर रेजिस्टन्ससह सादर केला आहे. यात हार्ट रेट सेन्सर आणि SpO2 सेन्सर हे हेल्थ फिचर मिळतात. हा स्मार्टवॉच बास्केटबॉल, क्रिकेट, हायकिंग, स्कीईंग आणि योग असे 26 स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. तसेच यात अॅक्सेलरोमीटर आणि जायरोस्कोप देण्यात आला आहे.
Moto Watch 100 मध्ये 355mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी चार्ज 0-100 चार्ज होण्यासाठी फक्त 1 तास लागतो. फुल चार्ज झाल्यावर हा वॉच 14 दिवसांपर्यंतचा बॅकअप देऊ शकतो, असे कंपनीने सांगितले आहे. यात अँड्रॉइड वियर ओएस ऐवजी Moto Watch OS चा वापर करण्यात आला आहे. कनेक्टिविटीसाठी यात जीपीएस, GLONASS आणि BeiDou सारखे ऑप्शन आहेत.