मोटो एक्स ४: जाणून घ्या सर्व फिचर्स

By शेखर पाटील | Published: September 4, 2017 03:00 PM2017-09-04T15:00:00+5:302017-09-04T15:00:00+5:30

मोटो एक्स ४ या स्मार्टफोनची खासियत म्हणजे यात गुगल असिस्टंट आणि अमेझॉन कंपनीचा अलेक्झा हा व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट इनबिल्ट अवस्थेत देण्यात आला आहे. हे दोन्ही असिस्टंट व्हाईस कमांडवर आधारित आहेत

Moto X4: Know all the features | मोटो एक्स ४: जाणून घ्या सर्व फिचर्स

मोटो एक्स ४: जाणून घ्या सर्व फिचर्स

Next
ठळक मुद्देयातील एक कॅमेरा मोनोक्रोम तर दुसरा आरजीबी या प्रकारातील असेलयातील पहिल्या कॅमेर्‍यात ड्युअल ऑटो-फोकस आणि एफ/२.२ अपार्चर, १.४ मायक्रो पिक्सलची सुविधा असेल.तर दुसर्‍या कॅमेर्‍यात १२० अंशातील व्ह्यू आणि एफ/२.२ अपार्चर, १.१२ मायक्रो पिक्सलचा समावेश असेल

मोटोरोला कंपनीने ड्युअल कॅमेरा आणि गुगल असिस्टंट तसेच अमेझॉन अलेक्झाचा सपोर्ट असणारा मोटो एक्स ४ या स्मार्टफोनला बाजारपेठेत उतरण्याची घोषणा केली आहे. मोटो एक्स ४ या स्मार्टफोनची खासियत म्हणजे यात गुगल असिस्टंट आणि अमेझॉन कंपनीचा अलेक्झा हा व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट इनबिल्ट अवस्थेत देण्यात आला आहे. हे दोन्ही असिस्टंट व्हाईस कमांडवर आधारित आहेत. याच्या मदतीने ध्वनी आज्ञावलीचा उपयोग करून युजर स्मार्टफोनच्या विविध फंक्शन्सचा वापर करू शकतो. यातील दुसरे लक्ष्यवेधी फिचर म्हणजे ड्युअल कॅमेरा सेटअप होय. याच्या मागील बाजूस १२ आणि ८ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे देण्यात आलेले आहेत.

यातील एक कॅमेरा मोनोक्रोम तर दुसरा आरजीबी या प्रकारातील असेल. यातील पहिल्या कॅमेर्‍यात ड्युअल ऑटो-फोकस आणि एफ/२.२ अपार्चर, १.४ मायक्रो पिक्सलची सुविधा असेल. तर दुसर्‍या कॅमेर्‍यात १२० अंशातील व्ह्यू आणि एफ/२.२ अपार्चर, १.१२ मायक्रो पिक्सलचा समावेश असेल. या दोन्ही कॅमेर्‍यांच्या मदतीने अतिशय उत्तम दर्जाच्या प्रतिमा काढता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात अल्ट्रा वाईड अँगल शॉट, प्रोफेशनल मोड, डेफ्थ डिटेक्शन, डेफ्थ इफेक्ट, सिलेक्टीव्ह फोकस, सिलेक्टीव्ह ब्लॅक अँड व्हाईट बॅकग्राऊंड, स्पॉट कलर, लँडमार्क/ऑबजेक्ट डिटेक्शन, पॅनोरामा मोड, स्लो-मोशन व्हिडीओ, बेस्ट शॉट आदींसह बारकोड/क्युआर कोड/बिझनेस कार्ड स्कॅनींग आदींची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला असून यात १.० मायक्रॉन पिक्सल, फ्लॅश आणि एफ/२.० अपार्चर आदी फिचर्स असतील

मोटो एक्स ४ या मॉडेलमध्ये फास्ट चार्जींगच्या सुविधेसह ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून ती पूर्ण दिवसभर चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर अवघ्या १५ मिनिटात ही बॅटरी ६ तासांपर्यंत चालण्यास सक्षम होत असल्याचेही कंपनीने नमूद केले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यु-टुथ ५.०, वाय-फाय, एनएफसी आदी पर्याय असतील. याशिवाय या मॉडेलमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर, जीपीएस, एफएम रेडिओ आदी फिचर्स असतील.

मोटो एक्स ४ या स्मार्टफोनमध्ये ५.२ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी म्हणजेच १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लासचे संरक्षक आवरण असेल. क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ऑक्टा-कोअर ६३० प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या मॉडेलची रॅम तीन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते दोन टिबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. तर या स्मार्टफोनचे ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोअरेज हे व्हेरियंटदेखील लवकरच उपलब्ध करण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. भारतात हा स्मार्टफोन येत्या काही महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे.

Web Title: Moto X4: Know all the features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.