मोटो झेड २ फोर्स : मजबूत डिस्प्लेसह अनेक उत्तमोत्तम फिचर्स

By शेखर पाटील | Published: February 16, 2018 01:04 PM2018-02-16T13:04:40+5:302018-02-16T13:05:59+5:30

डिस्प्ले खर्‍या अर्थाने शॅटरप्रूफ म्हणजेच अतिशय मजबूत असल्याचा कंपनीचा दावा

Moto Z2 Force feature of smartphone | मोटो झेड २ फोर्स : मजबूत डिस्प्लेसह अनेक उत्तमोत्तम फिचर्स

मोटो झेड २ फोर्स : मजबूत डिस्प्लेसह अनेक उत्तमोत्तम फिचर्स

Next

मुंबई: मोटोरोला कंपनीने भारतात आपला मोटो झेड २ फोर्स हा स्मार्टफोन लाँच केला असून यामध्ये अत्यंत मजबूत डिस्प्लेसह अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

लेनोव्होची मालकी असणार्‍या मोटोरोलातर्फे भारतात मोटो झेड २ फोर्स हे मॉडेल लाँच करण्यात आले. या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि क्युएचडी म्हणजे १४४० बाय २५६० पिक्सल्स क्षमतेचा शॅटरशील्ड या प्रकारातील पीओएलईडी डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. हा डिस्प्ले खर्‍या अर्थाने शॅटरप्रूफ म्हणजेच अतिशय मजबूत असल्याचा कंपनीचा दावा आहे. ही या स्मार्टफोनची खासियत मानली जात आहे. याची बॉडीदेखील अतिशय मजबूत असून ती ७००० सेरीज अ‍ॅल्युमिनीयमपासून तयार करण्यात आली आहे. यात क्वॉलकॉमचा ऑक्टॉ-कोअर स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम ६ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ती मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २ टेराबाईटपर्यंत वाढविण्याची व्यवस्था असेल.

मोटो झेड २ फोर्स या स्मार्टफोनच्या मागील बाजूस १२ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यात सोनी आयएमएक्स ३८६ प्रोसेसर प्रदान करण्यात आले आहेत. यात पीडीएएफ, लेसर ऑटो-फोकस, ड्युअल एलईडी फ्लॅश आदी फिचर्स देण्यात आले आहेत. यात प्रतिमांना बोके इफेक्ट प्रदान करता येणार आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात ८५ अंशाचा वाईड लेन्स असणारा एफ/२.२ अपार्चरयुक्त ५ मेगापिक्सल्स क्षमतेचा कॅमेरा दिलेला आहे. यात एलईडी फ्लॅशची सुविधा आहे. यातील बॅटरी २७३० मिलीअँपिअर क्षमतेची असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरिओ या अद्ययावत आवृत्तीवर चालणारा असेल.

मोटो झेड २ फोर्स या स्मार्टफोनचे मूल्य ३४,९९९ रूपये असून हे मॉडेल ग्राहकांना फ्लिपकार्ट या शॉपिंग पोर्टलसह मोटा हब स्टोअर्समधून खरेदी करता येणार आहे. हा स्मार्टफोन मोटो मॉडस्ला कनेक्ट करता येणार आहे. मोटोरोलाने आधीच मोटो मॉड उपलब्ध केले आहेत. तर या स्मार्टफोनसोबत टर्बो पॉवर मॉड सादर करण्यात आले आहे. तसेच या मॉडेलमध्ये मोटो एक्सपेरियन्स या फिचर्सच्या अंतर्गत काही उपयुक्त सेवा प्रदान करण्यात आल्या आहेत. यातील मोटो डिस्प्लेच्या अंतर्गत स्क्रीन लॉक असतांनाही नोटिफिकेशन्स दिसू शकणार आहेत. मोटो व्हाईसच्या मदतीने वेदर अलर्ट व कॅलेंडर अपडेटची माहिती मिळणार आहे. तसेच यात मोटो अ‍ॅक्शन हे फिचरदेखील देण्यात आले असून याच्या माध्यमातून फिंगरप्रिंट स्कॅनरचा सुलभ उपयोग शक्य आहे.
 

Web Title: Moto Z2 Force feature of smartphone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.