2000 रुपयांच्या मोटोरोलाचे फीचरफोन Moto A10, A50 आणि A70 होऊ शकतात भारतात लाँच  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2021 07:50 PM2021-11-04T19:50:39+5:302021-11-04T19:50:52+5:30

Moto A-series Feature Phone India Launch: मोटोरोला लवकरच भारतात Moto A10, A50 आणि A70 असे तीन फिचरफोन सादर करणार आहे. जे 2 वर्षांच्या रिप्लेसमेंट गॅरंटीसह सादर केले जातील.  

Motorola a10 a50 a70 feature phones to launch in india soon   | 2000 रुपयांच्या मोटोरोलाचे फीचरफोन Moto A10, A50 आणि A70 होऊ शकतात भारतात लाँच  

2000 रुपयांच्या मोटोरोलाचे फीचरफोन Moto A10, A50 आणि A70 होऊ शकतात भारतात लाँच  

Next

मोटोरोला भारतात लवकरच Moto A10, A50 आणि A70 असे तीन फिचरफोन सादर करू शकते. कंपनीने याची कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु YTechb ने या तिन्ही फोनच्या फोटोज आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे आणि मोटोरोला देशातील फिचरफोन  सेगमेंटमध्ये उतरणार असल्याचे सांगितले आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, Moto A10 आणि Moto A50 मध्ये 1.8-इंचाचा डिस्प्ले मिळेल. तसेच यात MediaTek MT6261D चिपसेट देहात येईल. दोन्ही फोन्समध्ये हिंदी, तामिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड अशा भारतीय भाषा देण्यात येतील. तसेच यात ऑटो-कॉल रेकॉर्डिंग आणि वायरलेस FM रेडियो सारखे फिचर देण्यात येतील. हे फोन्स ड्युअल सिम आणि मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट मिळतो. फक्त Moto A50 मधील रियर कॅमेरा कॅमेरा आणि टॉर्च Moto A10 मध्ये मिळत नाही. दोन्ही फोन्स 1,750mAh बॅटरीला सपोर्ट करतात.  

Moto A70 या सीरिजमधील मोठा फोन असेल. ज्यात 2.4 इंचाचा डिस्प्ले आणि Unisoc चिपसेट मिळेल. तसेच यात वीजीए कॅमेरा आणि एलईडी टॉर्च देण्यात येईल. या फोनमध्ये 100 एसएमएस आणि 2,000 कॉन्टॅक्ट्स साठवून ठेवता येतील. तसेच रेकॉर्डिंग, ऑटो-कॉल रेकॉर्डिंग आणि वायरलेस FM देखील देण्यात येईल. Moto A70 मध्ये 1,750mAh ची बॅटरी आहे.  

कंपनीनं Moto A-series चे फीचर फोन 2 वर्षाच्या रिप्लेसमेंट गॅरंटीसह सादर केले जातील. ज्यात भारतीय Lava ची मदत घेतली जाईल. हे फोनस कधी बाजारात येतील हे मात्र समजले नाही. A10 ची किंमत जवळपास 1,500 रुपयांपर्यंत असू शकते. तर A50 आणि A70 ची किंमत 2,000 रुपयांपर्यंत ठेवली जाईल.  

Web Title: Motorola a10 a50 a70 feature phones to launch in india soon  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.