108MP कॅमेरा असलेल्या मोटोरोला फोनची भारतीय किंमत लीक; जाणून घ्या Edge 20 आणि Edge 20 Fusion ची वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Published: August 13, 2021 12:16 PM2021-08-13T12:16:24+5:302021-08-13T12:22:31+5:30

Motorola Edge 20 Price: लीकमध्ये मोटोरोला एज 20 आणि एज 20 फ्यूजनच्या भारतीय किंमतीचा खुलासा झाला आहे. टिप्सटर देब्यान रॉयने या स्मार्टफोन्सच्या किंमतीची माहिती दिली आहे.  

Motorola Edge 20 Fusion Price in india revealed before 18 august launch  | 108MP कॅमेरा असलेल्या मोटोरोला फोनची भारतीय किंमत लीक; जाणून घ्या Edge 20 आणि Edge 20 Fusion ची वैशिष्ट्ये 

108MP कॅमेरा असलेल्या मोटोरोला फोनची भारतीय किंमत लीक; जाणून घ्या Edge 20 आणि Edge 20 Fusion ची वैशिष्ट्ये 

Next
ठळक मुद्देजागतिक बाजारातील एज 20 लाईट भारतात मोटोरोला एज 20 फ्यूजन म्हणून सादर केला जाईल. Motorola Edge 20 स्मार्टफोन भारतात 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर केला जाईल. Motorola Edge 20 Fusion या सीरिजमधील सर्वात स्वस्त आणि छोटा फोन आहे.

Motorola येत्या 17 ऑगस्टला भारतात आपल्या ‘एज 20‘ सीरीज अंतर्गत Motorola Edge 20 आणि Motorola Edge 20 Fusion हे दोन स्मार्टफोन सादर करणार आहे. याची माहिती कंपनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. हे फोन ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होतील. आता एका नवीन लीकमध्ये मोटोरोला एज 20 आणि एज 20 फ्यूजनच्या भारतीय किंमतीचा खुलासा झाला आहे. टिप्सटर देब्यान रॉयने या स्मार्टफोन्सच्या किंमतीची माहिती दिली आहे.  

Motorola Edge 20 Fusion ची किंमत 

जागतिक बाजारातील एज 20 लाईट भारतात मोटोरोला एज 20 फ्यूजन म्हणून सादर केला जाईल. या फोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 21,499 रुपये असेल. तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 23,999 रुपयांमध्ये बाजारात येईल.  

Motorola Edge 20 ची किंमत 

देब्यान रॉयने दिलेल्या माहितीनुसार Motorola Edge 20 स्मार्टफोन भारतात 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर केला जाईल. या एकमेव व्हेरिएंटची किंमत कंपनी 29,999 रुपये ठेऊ शकते. 

Motorola Edge 20 चे स्पेसिफिकेशन्स     

Motorola Edge 20 स्मार्टफोन मध्ये 6.67 इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन आणि 144हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. मोटोरोला एज 20 स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेट आहे. हा फोन अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टमसह सादर करण्यात आला आहे.     

फोटोग्राफीसाठी या मोटोरोला फोनमध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सोबत 16 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर आणि 8 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहेत. सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. मोटोरोला एज 20 मध्ये 4,000एमएएचची बॅटरी 33W TurboPower फास्ट चार्जींगसह देण्यात आली आहे.   

Motorola Edge 20 Fusion चे स्पेसिफिकेशन्स   

Motorola Edge 20 Fusion या सीरिजमधील सर्वात स्वस्त आणि छोटा फोन आहे. या फोनमध्ये 6.67 इंचाचा 90Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित माय यूएक्सवर चालतो. या फोनमध्ये कंपनीने मीडियाटेकचा Dimensity 800 चिपसेट 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज दिली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते.   

फोटोग्राफीसाठी मोटोरोला एज 20 फ्युजन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. या सेटअपमध्ये 108 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. हा मोटोरोला फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Motorola Edge 20 Fusion मधील 5,000एमएएचची मोठी बॅटरी 30वॉट टर्बोपावर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.    

Web Title: Motorola Edge 20 Fusion Price in india revealed before 18 august launch 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.