108MP कॅमेरा असलेला Motorola Edge 20 Fusion आजपासून खरेदीसाठी उपलब्ध; अशाप्रकारे मिळवा 5000 रुपयांचा डिस्काउंट  

By सिद्धेश जाधव | Published: August 27, 2021 11:38 AM2021-08-27T11:38:41+5:302021-08-27T11:38:49+5:30

Motorola Edge 20 Fusion Price: Motorola Edge 20 Fusion मिड रेंज सेगमेंट सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 800यू 5जी प्रोसेसर मिळतो.  

Motorola edge 20 fusion will be availble for sale at rs 21499 today in india at 12 PM on flipkart  | 108MP कॅमेरा असलेला Motorola Edge 20 Fusion आजपासून खरेदीसाठी उपलब्ध; अशाप्रकारे मिळवा 5000 रुपयांचा डिस्काउंट  

108MP कॅमेरा असलेला Motorola Edge 20 Fusion आजपासून खरेदीसाठी उपलब्ध; अशाप्रकारे मिळवा 5000 रुपयांचा डिस्काउंट  

Next

गेल्या आठवड्यात भारतात सादर झालेला Motorola Edge 20 Fusion स्मार्टफोन आज दुपारी 12 वाजल्यापासून सेलसाठी उपलब्ध होईल. या स्मार्टफोन सोबत कंपनीने Motorola Edge 20 स्मार्टफोन देखील देशात आणला होता. Edge 20 Fusion मध्ये 108MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि डायमेंसिटी 800यू 5जी प्रोसेसर असे शानदार स्पेक्स मिळतात. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनची संपूर्ण माहिती.  

Motorola Edge 20 Fusion ची भारतीय किंमत  

Motorola Edge 20 Fusion चे दोन व्हेरिएंट्स भारतात उपलब्ध होणार आहेत. फोनचा छोटा व्हेरिएंट 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट 21,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 22,999 रुपये ठेवण्यात आली आहे. Motorola Edge 20 Fusion चे हे दोन्ही व्हेरिएंट 27 ऑगस्टपासून फ्लिपकार्टवरून विकत घेता येतील. हे दोन्ही व्हेरिएंट्स आज दुपारी 12 वाजल्यापासून Flipkart आणि लिडिंग रिटेलर्सच्या माध्यमातून विकत घेता येतील. फ्लिपकार्टवर ICICI Bank क्रेडिट कार्ड आणि EMI ट्रँजॅक्शनवर फ्लॅट 5,000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. 

Motorola Edge 20 Fusion चे स्पेसिफिकेशन्स     

Motorola Edge 20 Fusion स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा 90Hz रिफ्रेश रेट असलेला अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 20:9 मॅक्स विजन अस्पेक्ट रेशियो आणि 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित माय यूएक्सवर चालतो, जो Android 13 पर्यंत अपडेट केला जाईल. या फोनमध्ये कंपनीने मीडियाटेकचा Dimensity 800 चिपसेट दिला आहे. या मोटोरोला फोनमध्ये 8GB पर्यांतच रॅम आणि 128GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते. 

फोटोग्राफीसाठी मोटोरोला एज 20 फ्युजन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. या सेटअपमध्ये 108 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. हा मोटोरोला फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Motorola Edge 20 Fusion मधील 5,000एमएएचची मोठी बॅटरी 30वॉट टर्बोपावर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.   

Web Title: Motorola edge 20 fusion will be availble for sale at rs 21499 today in india at 12 PM on flipkart 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.