या महिन्यात Motorola Edge 20 Fusion येणार भारतात; मिळणार 108MP चा दमदार कॅमेरा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 12:20 PM2021-08-10T12:20:03+5:302021-08-10T12:21:21+5:30

अलीकडेच जागतिक बाजारात मोटोरोलाने आपली एज 20 सीरीज सादर केली आहे. या सीरीजमध्ये Motorola Edge 20, Motorola Edge 20 ...

Motorola edge 20 fusion will launch in india soon with dimensity 800u  | या महिन्यात Motorola Edge 20 Fusion येणार भारतात; मिळणार 108MP चा दमदार कॅमेरा 

या महिन्यात Motorola Edge 20 Fusion येणार भारतात; मिळणार 108MP चा दमदार कॅमेरा 

googlenewsNext
ठळक मुद्देया फोनमध्ये कंपनीने मीडियाटेकचा Dimensity 800 चिपसेट 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज दिली आहे.फोटोग्राफीसाठी मोटोरोला एज 20 फ्युजन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो.

अलीकडेच जागतिक बाजारात मोटोरोलाने आपली एज 20 सीरीज सादर केली आहे. या सीरीजमध्ये Motorola Edge 20, Motorola Edge 20 Pro आणि Motorola Edge 20 Lite असे तीन स्मार्टफोन लाँच झाले होते. यापैकी दोन स्मार्टफोन या महिन्यात भारतीय बाजारात दाखल होतील. यात एज 20 आणि एज 20 लाइटचा समावेश असेल. आता टेक वेबसाइट प्राइसबाबा दावा केला आहे कि, Edge 20 Lite भारतात Edge 20 Fusion नावाने लाँच केला जाईल. मोटोरोलाने सादर केलेल्या टीजरमध्ये या डिवाइसच्या मागच्या बाजूची डिजाइन दिसली आहे. ही डिजाईन युरोपात लाँच झालेल्या एज 20 लाइटसारखी आहे. त्यामळे हे दोन्ही स्मार्टफोन्स एकच असून फक्त नावात बदल केला जाईल, अशी चर्चा आहे.  

Motorola Edge 20 Fusion चे स्पेसिफिकेशन्स  

Motorola Edge 20 Fusion या सीरिजमधील सर्वात स्वस्त आणि छोटा फोन आहे. या फोनमध्ये 6.67 इंचाचा 90Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित माय यूएक्सवर चालतो. या फोनमध्ये कंपनीने मीडियाटेकचा Dimensity 800 चिपसेट 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज दिली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते.  

फोटोग्राफीसाठी मोटोरोला एज 20 फ्युजन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. या सेटअपमध्ये 108 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. हा मोटोरोला फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Motorola Edge 20 Fusion मधील 5,000एमएएचची मोठी बॅटरी 30वॉट टर्बोपावर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.   

Web Title: Motorola edge 20 fusion will launch in india soon with dimensity 800u 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.