108MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Motorola Edge 20 Lite लाँच; जाणून घ्या संपूर्ण माहिती
By सिद्धेश जाधव | Published: July 30, 2021 01:01 PM2021-07-30T13:01:34+5:302021-07-30T13:02:36+5:30
Motorola Edge 20 Lite Price: Motorola Edge 20 Lite च्या एकमेव 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 349.99 युरो ठेवण्यात आली आहे.
Motorola ने युरोपियन बाजारात आपली ‘एज 20‘ सीरीज सादर केली आहे. लवकरच या सीरिजमधील स्मार्टफोन भारतासह जगभरात लाँच केले जातील. मोटोरोलाने नवीन सीरीज अंतगर्त तीन नवीन स्मार्टफोन आणले आहेत, हे स्मार्टफोन्स Motorola Edge 20, Motorola Edge 20 Pro आणि Motorola Edge 20 Lite नावाने बाजारात येतील. या लेखात आपण सीरिजमधील स्वस्त एज 20 लाइटची माहिती बघणार आहोत.
Motorola Edge 20 Lite चे स्पेसिफिकेशन्स
Motorola Edge 20 Lite या सीरिजमधील सर्वात स्वस्त आणि छोटा फोन आहे. या फोनमध्ये 6.67 इंचाचा 90Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित माय यूएक्सवर चालतो. या फोनमध्ये कंपनीने मीडियाटेकचा Dimensity 720 चिपसेट 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज दिली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी मोटोरोला एज 20 लाइट मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. या सेटअपमध्ये 108 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. हा मोटोरोला फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Motorola Edge 20 Lite मधील 5,000एमएएचची मोठी बॅटरी 30वॉट टर्बोपावर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Motorola Edge 20 Lite ची किंमत
मोटोरोला एज 20 लाइटच्या एकमेव 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 349.99 युरो ठेवण्यात आली आहे. ही किंमत अंदाजे 31,000 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते.