108MP कॅमेरा असलेला मोटोरोलाचा ‘प्रो’ स्मार्टफोन या तारखेला होणार सादर; Motorola India ने दिली माहिती
By सिद्धेश जाधव | Published: September 21, 2021 04:31 PM2021-09-21T16:31:35+5:302021-09-21T16:32:42+5:30
Motorola Edge 20 Pro Price In India: फ्लिपकार्टच्या लिस्टिंगनुसार मोटोरोला एज 20 प्रो भारतात 1 ऑक्टोबरला लाँच केला जाईल. हा फोन जागतिक बाजारात 28,000 रुपयांच्या आसपासच्या किंमतीत सादर झाला आहे.
कालच बातमी आली होती कि Motorola येणाऱ्या फ्लिपकार्ट बिग बिलियन डेजमध्ये आपला नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे. तेव्हा कंपनी नेमका कोणता स्मार्टफोन सादर करणार आहे याचा खुलासा झाला नव्हता. आज कंपनीने अधिकृत टीजर जारी केला आहे. या टीजरमधून आगामी मोटोरोला स्मार्टफोनच्या नावाची माहिती मिळाली आहे.
मोटोरोला इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक ट्विट केले आहे. यात ट्विटमध्ये एक फोटो आणि ‘द अॅब्सोल्यूट प्रो’ अशी कॅप्शन दिली आहे. या टॅगलाईनवरून आगामी हँडसेट मोटोरोला एज 20 प्रो असू शकतो, असे समजते. हा फोन जुलैमध्ये जागतिक बाजारात सादर करण्यात आला होता. फ्लिपकार्टच्या लिस्टिंगनुसार मोटोरोला एज 20 प्रो भारतात 1 ऑक्टोबरला लाँच केला जाईल. हा फोन जागतिक बाजारात 28,000 रुपयांच्या आसपासच्या किंमतीत सादर झाला आहे.
Motorola Edge 20 Pro चे स्पेसिफिकेशन्स
Motorola Edge 20 Pro मध्ये 6.7-इंचाचा ओएलईडी होल डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेट, 576Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 870 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 12GB पर्यंतचा Turbo LPDDR5 रॅम आणि 256GB पर्यंतची UFS 3.1 स्टोरेजसह मिळते. हा फोन अँड्रॉइड 11 वर आधारित MYUI 2.0 स्किनवर चालतो.
या मोटोरोला स्मार्टफोनचा कॅमेरा सेगमेंट पाहता, यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील मुख्य कॅमेरा 108 मेगापिक्सलचा सेन्सर आहे. त्याचबरोबर 16 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स आणि एक 8 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे जी 5x ऑप्टिकल झूम आणि 50x डिजिटल झूमला सपोर्ट करते. हा फोन सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Motorola Edge 20 Pro मध्ये 4,520mAh ची बॅटरी 30W टर्बोपावर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.