576Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 108MP रियर कॅमेऱ्यासह Motorola Edge 2021 स्मार्टफोन लाँच
By सिद्धेश जाधव | Published: August 20, 2021 06:07 PM2021-08-20T18:07:26+5:302021-08-20T18:18:26+5:30
Motorola Edge 2021 price: कंपनीने Motorola Edge 2021 अमेरिकेत सादर केला आहे. तिथे या फोनच्या किंमत 8GB RAM आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत $699 (अंदाजे 52,000 रुपये) ठेवण्यात आली आहे.
Motorola ने या महिन्यात आपले स्मार्टफोन लाँच करण्याचा सपाटा सुरूच ठेवला आहे. कंपनीनं एका पाठोपाठ एक स्मार्टफोन सादर करत आहे. नुकतेच कंपनीने Motorola Edge 20, Edge 20 Lite, Edge 20 Fusion आणि Edge 20 Pro सादर केले आहेत. तर आता कंपनीने Motorola Edge 2021 अमेरिकेत सादर केला आहे. तिथे या फोनच्या किंमत 8GB RAM आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत $699 (अंदाजे 52,000 रुपये) ठेवण्यात आली आहे.
Motorola Edge 2021 चे स्पेसिफिकेशन्स
Motorola Edge 2021 स्मार्टफोन 6.7 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे. हा एक 8बिट एलसीडी डिस्प्ले आहे, जो 144हर्ट्ज रिफ्रेश तसेच 576हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेट मिळतो. ज्याला 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजची जोड देण्यात आली आहे. हा फोन माय यूएक्सवर चालतो जो अँड्रॉइड 11 वर आधारित आहे. हे देखील वाचा: गरजेनुसार वाढवता येणार या स्मार्टफोनचा रॅम; 12GB रॅम, 5000mAh बॅटरीसह Vivo Y33s येणार भारतात
Motorola Edge 2021 मध्ये कंपनीने ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 108 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. हा मोटोरोला फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह या फोनमध्ये आयपी52 रेटिंग आणि साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. Motorola Edge 2021 स्मार्टफोनमध्ये 30वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएचची बॅटरी मिळते. हे देखील वाचा: आता टेम्परेचर गनचे देखील काम करणार स्मार्टफोन! 8500mAh बॅटरी आणि बिल्टइन थर्मामीटरसह आला हा स्मार्टफोन